पत्राचाळ प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणीसंदर्भात राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चौकशीची मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Cm Eknath Shinde On Demand Of Inquiry Of Sharad Pawar In Patra Chawl Scam Case)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. दरम्यान, त्यांना “पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आलेलं आहे. त्यांच्या चौकशीची देखील आता भाजपाकडून मागणी केली जात आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे?” असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, 'नाही, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन,' असं उत्तर दिलं.
त्यानंतर पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखही या बैठकीला उपस्थित असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. “तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार दोघांचं नाव आहे,” असे पत्रकाराने म्हटले. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, 'नाही, म्हणून मी त्या बाबतीत माहिती घेऊन नक्कीच आपण सविस्तर बोलू,' असे उत्तर दिले.
नेमकं काय आहे प्रकरण?
पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. याच प्रकरणात आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.