Maharashtra Politics: CM शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, काय झाली चर्चा?

cm eknath shinde on meeting with prakash ambedkar and alliance Maharashtra politics
cm eknath shinde on meeting with prakash ambedkar and alliance Maharashtra politics
Updated on

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदेगट आणि वंचितच्या युतीची चर्चा होत आहे. दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. ठाकरे- आंबेडकर यांनी २० नोव्हेंबरला एकाच मंचावर आले होते त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु झाली होती.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होता आंबेडकरांच्या राजगृही ही भेट झाली. यावेळी दीपक केसरकर आणि भावना गवळीही उपस्थित होत्या. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, यामध्ये कुठलंही राजकीय समीकरण नाही, कृपया गैरसमज करु नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं भूषन आणि त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू एवढंच या भेटीत होतं. या भेटीमध्ये कोणतही राजकीय चर्चा झाली नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

cm eknath shinde on meeting with prakash ambedkar and alliance Maharashtra politics
Jitendra Awhad: तुमच्या नवऱ्याचं किंवा नेत्याचं अर्धनग्न छायाचित्र...; चित्रा वाघ यांना आव्हाडांचा संतप्त सवाल

त्यावेळच्या वापरातल्या वस्तू, ही इमारत बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभी राहीली आहे, त्यावेळीची त्यांची वाचनाची खोली, अभ्यासाचा टेबल, खुर्ची त्यांची पुस्तके त्यांच्या वापरातल्या वस्तू हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो आज मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळाला. मी आज सदिच्छा भेट घेतली आहे. या वास्तूचं पावित्र्य हे बाबासाहेबांचे वास्तव्य आणि पदस्पर्शाने पुनित झाले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

cm eknath shinde on meeting with prakash ambedkar and alliance Maharashtra politics
PM Modi Jinping Meet: 'साहिबने लाल आंख नही दिखाई?'; चीनी अध्यक्षांच्या भेटीनंतर ओवेसींचा मोदींना खोचक टोला

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित आघाडी एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळवला असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर शिंदे-आंबेडकर भेटीला वेगळे महत्व आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.