शरद पवारांना CM शिंदेचं उत्तर; म्हणाले, 'त्यांचा नेहमीच आदर केला, पण...'

CM Eknath shinde
CM Eknath shinde sakal
Updated on

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीये, आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर राज्यात पुन्हा वेगळ चित्र पाहायला मिळे असे वक्तव्य केलं होतं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे ४० आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तेथेच आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर राज्यातील चित्र वेगळं असेल असं पवार म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देत म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर केला आहे, पण राज्यात ५० आमदार आमच्या भूमिकेच्या बरोबर आहेत, राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सोबत येत आहेत. राजकारण करायचे नाही. राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचं लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. द्रोपदी मुर्मू यांना शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे, त्या भूमिकेचं स्वागत आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उल्हासनगरमध्ये शिवसेनेला धक्का

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे अनेक नगरसेवक देखील आता शिंदे गटात सहभागी होत आहेत. राज्यातील नगरसेवक, जिल्हापरिषद, पंचायत समितीते अनेक पदाधीकारी आमच्यासोबत येत आहेत असे शिंदे यावेळी म्हणाले. उल्हासनगर येथील १५ पेक्षा जास्त नगरसेवक आज आले आहेत असे त्यांनी सांगितले. नाशिक, दिंडोरी आणि नगरचे देखील नगरसेवक शिंदे गटात सामिल झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

CM Eknath shinde
CNG-PNG Price Hike : पुन्हा महागाईचा झटका! सीएनजी, पीएनजीचे दर वाढले

शरद पवार काय म्हणाले होते?

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शरद पवार म्हणाले होते की, सुदैवाने आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद असल्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याकडे आहे. तरीही लोकांवर अन्याय होत राहिला तर लोकशाहीच्या चौकटीत रस्त्यावर उतरायचा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. अनेकजण मला बोलले की, ४० मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

CM Eknath shinde
Pune Schools: पुणे, पिंपरीमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()