Uddhav Thackeray : ''पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं देशद्रोह'', मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले...

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलताना, त्यांना औरंगजेबाची उपमा दिली. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला, असं सांगत त्यांनी मोदी, शाह यांच्यात औरंगजेबी वृत्ती असल्याचं म्हटलं होतं.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलताना, त्यांना औरंगजेबाची उपमा दिली. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला, असं सांगत त्यांनी मोदी, शाह यांच्यात औरंगजेबी वृत्ती असल्याचं म्हटलं होतं.

उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ''पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीची विधानं करणं चुकीचं आहे. औरंगजेबाने महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का दिला होता, अशा व्यक्तीची तुलना पंतप्रधानांशी करणं दुर्दैवी आहे, हा देशद्रोह आहे..'' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून याव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवसैनिक यासाठी कष्ट घेत आहेत.

Uddhav Thackeray
Ruturaj Gaikwad Captain IPL 2024 : गायकवाडला कर्णधार करणे CSK ची मोठी चूक? 2022 सारखंच होणार का...

उद्धव ठाकरेंवर बोलताना शिंदे म्हणाले, जिथून बाळासाहेब ठाकरे देशाला मार्गदर्शन करत होते, तिथे सावरकरांचा अपमान करणारे येवून बोलून गेले. याकूब मेननची कबर सजवणं कोणतं देशप्रेम होतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

''देशाच्या पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं अत्यंत चुकीचं असून हा देशद्रोह आहे. अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीतून जनता उत्तर देईल'' असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

बुधवारी सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी चौफेर टीकास्र सोडलं होतं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु त्यांना केवळ गुजरातबद्दल प्रेम आहे. एकामागून एक प्रकल्प गुजरातला नेल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला.

Uddhav Thackeray
Water Waste : टंचाईच्या झळा, पाणी मात्र रस्त्यावर; कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात चार दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया

''छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. पण औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोत येथे झाला. त्यामुळेच मोदी-शाह यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे.. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि मराठी माणूस संपवायचा आहे.'' असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.