Eknath Shinde : NDAच्या बैठकीला पोहोचताच एकनाथ शिंदेंची देशभरातल्या विरोधकांवर टीका; म्हणाले...

Sharad Pawar CM Eknath Shinde
Sharad Pawar CM Eknath Shindeesakal
Updated on

नवी दिल्लीः बंगळूरु येथे आज एकीकडे विरोधकांची बैठक सुरु आहे तर दुसरीकडे एनडीएची बैठक सायंकाळी आहे. त्या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीत दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील बैठकीसाठी पोहोचले आहेत.

माध्यमांशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, एनडीएमध्ये ३८ घटकपक्ष सहभागी आहेत. त्यामुळे २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पु्न्हा एकदा देशात एनडीएला बहुमत मिळेल. अजित पवार पक्षात आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar CM Eknath Shinde
Asian Games 2023 : दोनवेळची चॅम्पियन टीम इंडिया सहभागी होऊ शकत नाही... प्रशिक्षक झाले भावूक

देशातील विरोधकांबद्दल बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे विचारधारा असलेलं संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक नेता ठरवू शकत नाहीयेत. २०२४मध्ये संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढं एनडीए बळकट होईल, असं शिंदे म्हणाले.

Sharad Pawar CM Eknath Shinde
Brij Bhushan Sharan Singh: पुढील सुनावणीपर्यंत ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • 38 पक्ष एनडीएमध्ये सहभागी आहेत

  • मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही काम करत आहोत

  • शिवसेना हा कित्येक वर्षांचा भाजपचा सहकारी आहे

  • महाराष्ट्रात अजितदादा आणि त्यांचे सहकारी सोबत आल्याने ताकद वाढली आहे

  • सरकार आणखी मजबूत झालेलं आहे

  • एकीकडे विचारधारा असलेलं संघटन आहे

  • दुसरीकडे एवढे आहेत परंतु नेता ठरवू शकलेले नाहीत

  • २०२४मध्ये संपूर्ण देशात एनडीएला बहुमत मिळेल

  • मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबुत केलेली आहे

  • संपूर्ण जगामध्ये देशाचं नाव आदराने घेतलं जातं

  • विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढंच एनडीए मजबूत होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.