CM Shinde on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या विधानावर CM शिंदेंचं भाष्य; म्हणाले, हे जगजाहीर...

चंद्रकांत पाटील यांनी नुकताच बाबरी प्रकरणात शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं योगदान नव्हतं असा वादा केला होता.
Chandrakant Patil Eknath Shinde
Chandrakant Patil Eknath ShindeSakal
Updated on

मुंबई : बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काहीही सहभाग नव्हता, असं विधान केलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. मी चंद्रकांत पाटलांशी बोललो आहे, त्यांची बाळासाहेबांबाबत भूमिका स्पष्ट आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (CM Eknath Shinde reacted on Chandrakant Patil statement about Babri Demolition)

Chandrakant Patil Eknath Shinde
Babri Demolition: "बाबरी पाडली त्यावेळी PM मोदींचं नाव कुठेही नव्हतं"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शिंदे म्हणाले, "मी चंद्रकांत पाटलांशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं की, बाबरी पाडली त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे होते? बाळासाहेबांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. ज्यावेळी अयोध्येत बाबरी मशीदीचा वादग्रस्त भाग पाडला त्यावेळी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांबबात उद्गार काढले की मला शिवसैनिकांचा अभिमान आहे, हे जगजाहीर आहे. त्याचवेळेच 'गर्व से कहो हम हिंदू है'चा नाराही बाळासाहेबांनी दिला"

Chandrakant Patil Eknath Shinde
Unseasonal Rain: "तात्काळ घरं उभी करा"; CM शिंदेंचे कलेक्टर अन् विभागीय आयुक्तांना 'ऑन दि स्पॉट' आदेश

त्या केस संदर्भात लखनऊ कोर्टात बाळासाहेब ठाकरे गेले होते तिथं लालकृष्ण आडवाणी, बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, उमा भारती हे सर्वजण होते. त्यावेळी पक्षबिक्ष काहीही नव्हता, सगळे केवळ रामभक्त होते. त्यावेळी बाळासाहेबांनी परखड भूमिका घेतली होती, हे सर्वांना जगजाहीर आहे. बाळासाहेब नसते तर काय झालं असतं! मुंबईकरांचं त्यांनी रक्षण केलं. राज्यावर, देशावर जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा बाळासाहेबांनी परखड भूमिका घेतली आहे. मग ती सावकरकरांबाबत असो किंवा हिंदुत्वाची असो किंवा देशहिताची असो, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.