राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते अशा शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरले आहेत. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde reaction on Shivsena mla disqualification result slam Uddhav Thackeray marathi news)
एकनाथ शिंदे म्हणाले की, अखेर सत्याचा विजय झाला. हा निकाल म्हणजे लोकशाही, बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांचा विजय आहे. एकाधिकारशाही, घराणेशाही आणि हुकूमशाहीचा पराभव झाला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आजच्या निकालावर भाष्य करताना, ही मॅच फिक्सींग असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे तसेच या विरोधात ते सर्वोच्च न्यायालयात देखील जाणार आहेत, याबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, जेव्हा निकाल त्यांच्या बाजूने लागतो तेव्हा ते न्यायलय चांगलं असतं. जेव्हा मेरीटवर निकाल लागतो तेव्हा त्या संस्थेला चोर म्हटलं जातं. हे आताचं नाही हे फार पूर्वीपासूनचं आहे. लोकशाहीत कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. पण हा निकाल लोकांच्या डोळ्यात अंजन घालाणार आहे.
तुम्ही निवडणूक एकाबरोबर लढवता. भाजप सोबतची युती म्हणून जनतेने तुम्हाला मतं दिली. तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा आणि खुर्चीचा स्वार्थ होतो, हा मोह सुटल्यानंतर तुम्ही ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी जवळ करू नका म्हटलं त्या काँग्रसबरोबर तुम्ही सरकार स्थापन करता. तुम्ही स्वतःची खासगी मालमत्ता म्हणून पक्षाचा वापर करता तेव्हा असे निर्णय येतात. खासगी मालमत्ता समजून अशा प्रकारे पक्षाचा वापर करता येणार नाही, हा मोठा धडा त्यांना मिळाला आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीची हत्या करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. त्यांनी निवडणूक एकाबरोबर लढवली आणि सत्ता दुसऱ्यासोबत स्थापन केली, लोकशाहीची हत्या उद्धव ठाकरे यांनीच केली. ज्यांनी मतदान केलं त्यांच्याशी विश्वासघात करून त्यांनी महागद्दारी केली आहे, दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतः आरशात पाहावं असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. विजयाचे श्रेय बहुमताला देणार. लोकशाहीत बहुमत महत्वाचं असतं हे आज सिद्ध झालं आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.