Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत गोंधळ... एक मराठा लाख मराठा म्हणत घोषणाबाजी

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २२ जानेवारीपर्यंत सरकारला मुदत दिली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde
Updated on

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. दरम्यान त्यांच्या हिंगोली येथील सभेत गोंधळ झाल्याची माहीती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत गोंधळ घालण्यात आला. एक मराठा लाख मराठा म्हणत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २२ जानेवारीपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. २२ तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिली आहे.

Eknath Shinde
Ram Mandir: मोदींच्या व्हिसासाठी अमेरिकेसोबत लढणाऱ्या डॉक्टरला मिळालं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण; कोण आहे ही खास व्यक्ती? जाणून घ्या

राज्यात मराठा आरक्षणाच्या बाबातीत देखली जो शब्द दिला आहे. तो शब्द सरकार पाळणार आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहोत, असं शिंदे म्हणाले.

काही राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. दिलेला शब्द मी कधीही फिरवत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
राम मंदिर सोहळ्यासाठी सोनिया गांधी जाणार की नाही? अखेर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.