Eknath shinde: 'आता जे झालंय ते पॉलिटिकल Adjustment...' एकनाथ शिंदेंनी आमदार, खासदारांची घातली समजूत

राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काल आमदार, खासदारांची बैठक घेतली
Eknath shinde
Eknath shindeEsakal
Updated on

अजित पवार यांच्या महायुतीतील सामील झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार सोबत आल्यामुळे शिंदे गटाच्या मंत्रिपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून काल आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. (Latest Marathi News)

तर यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. अजित पवार यांच्या रुपाने आता शिंदे गटासमोर आव्हान निर्माण झालं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापासूनच कामाला लागले आहेत. (Marathi Tajya Batmya)

तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना ठाकरे आणि पवार कुटुंबिय विरहित हे सरकार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपले 50 पैकी 50 उमेदवार जिंकून आणू त्या दृष्टीने काम करू. मागच्या वेळी देखील अजित पवार आणि त्यांची टीम भाजपच्या मागे लागली होती. पण त्यावेळी त्यांना प्राधान्य न देता आपल्याला प्राधान्य दिलं आहे. आपली युती विचारांची होती, मात्र, आता जे झालंय ते पॅालिटिकल अ‍ॅडजस्टमेंट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. हा निर्णय मला विश्वासात घेऊन घेतल्याचेही ते म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Eknath shinde
Solapur Crime : तुला जिवंत सोडणार नाही म्हणत 16 जणांचा तरुणावर हल्ला; लाकूड, लाथाबुक्क्यांनी मारहाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी राजीनामा देणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. आपल्या राजीनाम्याच्या बातम्या कुणी पेरल्या याची आपल्याला माहिती आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

तसेच अजित पवार आल्याने आपल्या गटावर काही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मीच राहणार आहे. 2024नंतरही मीच मुख्यमंत्रीपदी असेल असं एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांना सांगितलं आहे.(Latest Marathi News)

Eknath shinde
Sharad Pawar: अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिल्लीत बोलावली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक

दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत 50 आमदार निवडून आणण्याचं टार्गेट ठेवा, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात लोकसभेच्या 45 जागा निवडून आणण्याचं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं टार्गेट असल्याचंही म्हंटलं आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करू, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Eknath shinde
Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमधील  सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात हलणार ‘पाळणा’!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.