Maharashtra Politics : CM शिंदे दिल्लीला गेले; जाताना लेकाला राज्याचा कारभार देऊन गेले?

खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा अशी खोचक टीका राष्ट्रवादीने केली आहे.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये श्रीकांत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीवर बसले असल्याचं दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रविकांत वरपे यांनी याबद्दलचं ट्विट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये वरपे म्हणतात की, खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?

Shrikant Shinde
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेऊन का फिरतात? 
Shrikant Shinde
Dasara Melava: शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी-शाह येणार; चर्चेला उधाण

वरपे यांनीच श्रीकांत शिंदेंचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवतायत असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मुख्यमंत्री बुधवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. अचानक शिंदेंनी आपला दौरा लांबवला आणि गुरुवारचा संपूर्ण दिवसही त्यांनी दिल्लीतच घालवला. रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()