CM Shinde News : पाटण्यात शिजली द्वेषाची खिचडी; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांच्या आघाडीवर मराठवाड्यातून घणाघात

CM Shinde News : पाटण्यात शिजली द्वेषाची खिचडी; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांच्या आघाडीवर मराठवाड्यातून घणाघात
Updated on

राज्य सरकारच्या शाषन आपल्या दारी हा कार्यक्रमाचे परभणी शहरात आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडी वर टीका केल्याचे पाहायला मिळालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंचावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षामध्ये फक्त दोन ते अडीच कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून खर्च झाले होते, आता फक्त एक वर्षामध्ये १०० कोटी पार झाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे आपण हा कार्यक्रम घेतला आहे. १३ एप्रिल रोजी पाटण येथून हा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

CM Shinde News : पाटण्यात शिजली द्वेषाची खिचडी; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांच्या आघाडीवर मराठवाड्यातून घणाघात
Sanjay Raut News : 'सनी देओल यांच्या बंगला २४ तासांत वाचवला, पण नितीन देसाई...'; राऊतांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणूकीत एनडीएला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक झाली होती. बैठकीवर हल्ला चढवताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण पाटणपासून (शासन आपल्या दारी) सुरूवात केली आणि काही लोकं पाटण्यामध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

CM Shinde News : पाटण्यात शिजली द्वेषाची खिचडी; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांच्या आघाडीवर मराठवाड्यातून घणाघात
भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं, मग..."; आव्हाडांनी बोलून दाखवली EVM बद्दलची शंका

आज अजित पवार आमच्या सोबत आले, त्यांनी जाहीर पणे सांगितले की देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार सोबत आले. आज ताकतीचं सरकार ताकतीने काम करत आहे. चांद्रयानचं उड्डाण आणि लँडिंग देखील यशस्वी झालं. यामागे इस्त्रो आणि शास्त्रज्ञांची मेहनत तर आहेच परंतु पंतप्रधान मोदी यांची इच्छाशक्ती आणि प्रेरणा यामागे आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य़ावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.