MP Shrikant Shinde: उज्जैन येथील सुप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराच्या दर्शन व्यवस्थेसाठी असलेले नियम काही व्हीआयपींकडून मोडले जात आहेत. मागच्या गुरुवारी रात्रीच्या वेळी असाच प्रकार घडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबासमवेत मंदिरात दर्शन घेतलं. मात्र यावेळी त्यांनी महाकाल मंदिर समितीचे नियम मोडले.