Eknath Shinde Melava: CM शिंदेचा ठाकरेंच्या प्रत्येक मुद्यावर पलटवार; जाणून घ्या सविस्तर

मेळाव्यातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Eknath Shinde Melava: CM शिंदेचा  ठाकरेंच्या प्रत्येक मुद्यावर पलटवार; जाणून घ्या सविस्तर
Updated on

सर्वांनी हळू जा; दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्या

दसरा मेळावा संपन्न झाल्यानंतर शेवटी एकनाथ शिंदे यांनी नीट आणि सुखरूप घरी जा काळजी घ्या आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन केलं आहे.

शिवसेनेला मोठं करण्यासाठी आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवलं 

शिवसेनेला आणि पक्षाला मोठं करण्यासाठी आम्ही घर सोडलं घरापासून दूर झालो. आमच्यासह घरातल्या लोकांनी त्रास सहन केला आहे. माझ्या बायकोने सुद्धा त्याग केलाय तिने भोगलंय सोसलंय आणि तुम्ही त्याची टिंगल करताय? तुम्ही म्हणता माझ्या वडिलांचं नाव घेतो म्हणतात पण आम्ही त्यांचा विचार पुढे नेतोय

माझ्या बायकोने सुद्धा त्याग केलाय तिने भोगलंय सोसलंय आणि तुम्ही त्याची टिंगल करताय?

हा एकनाथ संभाजी शिंदे आहे... तुम्ही म्हणताय बापाचं नाव लावता... माझ्या बापाने मोठा त्याग केलाय.. माझ्या बायकोने सुद्धा त्याग केलाय तिने भोगलंय सोसलंय आणि तुम्ही त्याची टिंगल करताय? तुम्ही म्हणता माझ्या वडिलांचं नाव घेतो म्हणतात पण आम्ही त्यांचा विचार पुढे नेतोय....

आनंद दिघेंची आठवण आत्ता आली म्हणता पण..

अरूणाताई म्हणायच्या एक दिवस याला मी ठाण्याचा मुख्यमंत्री करणार..

मी आजपर्यंत कुणाला बोललो नव्हतो पण..... मी जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो तेव्हा तुम्ही मला आनंद दिघेंची प्रॉपर्टी विचारली... तेव्हा मला धक्का बसला

एखादा नेता पॉप्युलर होत होते तेव्हा तुम्ही म्हणायचे त्यांना कापा... पण तेव्हा तुम्ही पक्षाचे पाय कापत आहात हे लक्षात आलं नाही....

हा लाईव्ह क्राउड आहे... भाड्याने आणलेला नाही...

पण विचार करून टीका करत जा

छत्रपती शिवाजी महाराजांच नाव तुम्ही कोणत्या अधिकारने घेता?

महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही गद्दारी केली आहे मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच नाव कोणत्या अधिकाराने घेता? असा सवलही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

आंदोलनात माझ्यावर 100 हून आधिक केसेस 

माझ्यावर १०० पेक्षा जास्त केसेसे आहेत, प्रत्येक वेळी हा शिंदे मोठा आरोपी होता... कुठे फेडाल हे पाप?

अरे माझ्या नातवाचा जन्म झाल्यावर तुमचं अध:पतन सुरू झालं.. कुणावर टीका करावी? किती लेव्हल जाऊन करायची.. पायाखालची वाळू सरकली ना....

तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती.. बाळासाहेबांचे विचार तोडून तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली... आता जर बाळासाहेब असते तरत्यांनी काय केलं असतं... बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ला मुख्यमंत्री केलं नसतं असं राणे म्हणाले.. मी पुढचं बोलत नाही आता

मराठा समाजाच्या मोर्चाला पण तुम्ही मुका मोर्चा म्हणालात

मराठा समाजाच्या मोर्चाला पण तुम्ही मुका मोर्चा म्हणालात.. पण या राज्यात कुणारवही अन्याय करणार नाही... मी घाबरत नाही.. लोकांसाठी मी काहीही बोगू शकतो... लोकांना न्याय दिल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही....

कटप्पाही स्वाभिमानी होता; तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता 

उद्धव ठाकरेंच्या कटप्पा टीकेवर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कटप्पा पण स्वाभिमानी होता... तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता.. का त्रास देताय शिवसैनिकांना... आम्ही समोरून वार करणारे आहोत.. पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत... मागच्या सरकारच्या काळात आमच्यावर मोक्काचे कलम लागले, कार्यकर्ते तडीपार केले गेले पण मी अन्याय होऊ देणार नाही.. असे धंदे आम्ही होऊ देणार नाही..

त्यांनी सांगितलं निष्ठावंत शिवसैनिकानी सांगावं मी राजीनामा देतो.. पण आता राहिलेत कीती?

परिणामांची चिंता आम्ही करणार नाही; जनतेला न्याय मिळवून देऊ

आम्ही होणाऱ्या परिणामांची चिंता करत नाही आम्ही जनतेला न्याय मिळवून द्यायच काम करू आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. अन्याय करून आम्हाला कोणालाही पक्षात घ्यायच नाही.

पक्षातला कार्यकर्ता आणि पदाधिकारी मोठा केल्याशिवाय पक्ष वाढत नाही

मालक आणि नोकर असायला ही काय प्रायव्हेट कंपनी आहे का... अशाने पक्ष वाढतो का

पक्षातला कार्यकर्ता आणि पदाधिकारी मोठा केल्याशिवाय पक्ष वाढत नाही...

रामदासभाईंचे भाषण चांगलं झालं म्हणून त्यांचं भाषण कट... कुणी चांगलं केलं तर तुम्हाला बघवत नाही..

मी सांगतो हा शिवसैनिक नोकर नाही... यानेच शिवसेना मोठी केली आहे...

दाऊद आणि याकूबचा हस्तक होण्यापेक्षा मोदी शाहांचा हस्त होणे चांगले..

या देशात जेजे नेतृत्व करतात त्यांच्या सोबत आम्ही आहोत.. निवडणुका आल्या की मराठी माणूस... पण आता मराठी माणूस फसणार नाही....

कारण जेव्हा मी फिरत होतो तेव्हा मला लोकं सांगत होते, त्या लोकांच्या हिताचं काम मी आता करेल...

नव्या मुंबईच्या विमानतळाला नाव तुम्हीच मला सांगितलं..... समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं

बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजायचे त्यांना तुम्ही घरगडी समजता

आम्ही काय केलं नाही ते सांगा, जेव्हा संकटं आली तेव्हा तेव्हा शिवसैनिक मदत करायला स्वत:चा जीव धोक्यात घातला. अशा वेळी बाळासाहेब शिवसैनिकांच्या पाठीमागे उभे राहायचे पण तुम्ही कुणाच्या पाठीमागे उभे राहिलात? पण हा थापा... त्याचीही तुम्ही चेष्टा केली.... बाथरूम साफ करणारा...म्हणता . मी सांगायचो सगळे मोठे झाल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही असं का करत होतात. आपला नेता पुढ जात असेल तर बघवत नाही.

तुम्ही घरी बसून वर्क फ्रॉम होम करत होता पण आम्ही काम करत होतो

मी सांगली कोल्हापूरमध्ये पूर आला तेव्हा गेलो होतो पण तेव्हा मी आरोग्य खात्याचा मंत्री होतो. महापूर आला आपत्ती आली तरी मी गेलो..

कोविडमध्ये तर कोण कुणाला भेटत नव्हता पण मी गेलो ना पीपीई कीट घालून हॉस्पिटलमध्ये. कोणत्याही संकटाच्या काळात मी उभा राहिलो

उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही

लोकांनी अरबो रूपये कमावले पण बाळासाहेबांनी लोकांचं प्रेम कमावलं

लोकांकडे अरबो रूपये असतील पण बाळासाहेबांनी लोकांचं प्रेम कमावलं होतं, तीच त्यांची संपत्ती होती पण नंतर त्यांच्या वाट्याला आली अवहेलना... चप्पल न काढता शिवसैनिकांना हुसकावून दिलं जात होतं. ज्या पायऱ्यावरून हुसकावून लावले जात होतं त्याच पायऱ्यावर तुम्ही जाऊन भेटू लागलात...

मी गणपती दर्शनाला गेल्यावरही टीका झाली....

शिवसेना हे बालासाहेबांचं कुटुंब होतं पण हम दो हमारे दो हे तुमचं कुटुंब... तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होता पण आम्ही वर्क विदाऊट होम करत होतो.

सातच्या आणि आठच्या आत घरी जाण्याची सवय नाही..

जेव्हा दुष्काळ होता तेव्हा रामदास भाईंनी त्याच्या पैशातून चाऱ्याच्या, पाण्याच्या टाक्या दिल्या

पण जेव्हा महापूर आला तेव्हादेखील लोकांनी जीव धोक्यात घालून काम केलं

ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता

बाळासाहेबांना ज्यांनी अटक केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आज बसता. यावरून तुमचे विचार दिसतात. तुम्ही म्हणाल की, तुम्हीपण सोबत होता पण हो.आम्ही पण होतो पण सत्ता तुमच्याकडे होती. एकनाथ शिंदे हा देणारा आहे, घेणारा नाही. म्हणून तुम्ही माझ्यामागे उभे आहात. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या लोकांना तुम्ही सरकारमध्ये घेणार नाही अशी अट का घातली नाही,,, हेच तर आमचं दुर्दैव आहे.

मी कंत्राटी कामगार मी विकासाचं कंत्राट घेतलंय 

मला सगळे म्हणतात कंत्राटी कामगार आहे. कंत्राटी मुख्यमंत्री आहे होय मी कबूल करतो की मी कंत्राटी कामगार आहे. मी विकासाच कंत्राट घेतलं आहे. तुम्ही म्हणताय की हा मुख्यमंत्री कंत्राीटी आहे पण मी सांगतो होय मी कंत्राटी आहे... मी जनतेची सेवा करण्याचे, राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचे कंत्राट मी घेतलंय... म्हणून या राज्याचं कंत्राट योग्य कंत्राटदाराच्या हाती गेलंय... ज्या लोकांनी सेना संपवण्यासाठी काय काय केलं हे तुम्हााला सांगायची गरज नाही,,,, बाळासाहेबांनी हे आधीच ओळखलं होतं... काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे देशाचं वाटोळं झालं आणि त्यांच्याच दावणीला तुम्ही सेना बांधली..

ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता..

सावरकर हे आमचं दैवत आहे, पण काँग्रेसचा विरोध म्हणून त्यांचं नाव आम्ही का घ्यायचं नाही? माफीवीर म्हणून तुम्ही सावरकरांचा करायचा आणि आम्ही गप्प बसायचं

एक वेळ मी माझं दुकान बंद करेल पण काँग्रेससोबत जाणार नाही असं सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली.. किती लाचारी करावी

बाळसाहेबांची अपुरी स्वप्न पूर्ण करणाऱ्यांची तुम्ही टिंगल करता 

तुम्हाला मोदींचा अभिमान वाटला पाहिजे, मी इंदिरा गांधींचा पण आदर करत होतो... पण मोदीमुळे या देशाचं नाव जगभर पसरलंय.. जेव्हा बाहेरच्या लोकांवर संकट येतं त्यावेळी आपल्या देशातून मदत जाते...

जे बाळासाहेबांचे स्वप्न होतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरमधले कलम ३७० हटवतो ते स्वप्न पूर्ण झालं आणि तुम्ही त्यांची टिंगल करता

आमच्या आमदारांना विमानातून उतरवण्याचे काम तुम्ही केलं पण ते आयोध्या मंदिर आता पूर्ण झालं आहे... आणि तुम्ही त्यांची टिंगल करता?

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? मुख्यमंत्र्यांचा सवाल 

तुम्ही आमदारांची कशी खिल्ली उडवली रेडे पानवाला डुक्कर अशा एक ना अनेक गोष्टी बोलून तुम्ही आमदारांची खिल्ली उडवली. या देशाच्या पंतप्रधान, केंद्राचे गृहमंत्री अशा लोकांचीही तुम्ही खिल्ली उडवता का एक सामान्य माणूस चांगल्या पदावर नाही का बसू शकत? राम मंदिर बनवणाऱ्या लोकांचीही तुम्ही टिंगल करता? बाळसाहेबांच स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकांची तुम्ही टिंगल करता तुम्ही काय केलं?

बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है हे बोलायला शिकवलं

बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है हे बोलायला शिकवलं. तुम्हाला फक्त सहाव्या मजल्यावर तुमच्या नावाचा फोटो लागला याचं तुम्हाला कौतुक होतं पण सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा चालू होता.

देशविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांना सोडणार नाही 

शिवसेना देशभक्त आणि राष्ट्रभक्ती करणारी आहे. देशविरोधी घोषणा दिल्या तर त्या खपवून घेतली जाणार नाही. देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या लोकांना सोडणार नाही. देशाच्या विरोधी कारवाया खपवून घेणार आहे. आणि यांना या गोष्टीवर बोलवत नाही हे कसले विचार आहेत यांचे. PFI वर बंदी घातल्यावर काही लोक RSS वर बंदी घाला अशी मागणी करतात ही कोणत्या आणि कसल्या विचारांची माणसं आहेत त्यांना मनाची नाही तर जणाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे.

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार 

आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्त्वाचं आहे, आपण सगळे बाळासाहेबांचे निष्ठावंत भक्त आहोत. त्यांचे खरे वारसदार.. विचारांचे वारसदार.. वारसा हा विचारांचा असतो तो जपायचा असतो.. आम्ही विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.

सत्तेसाठी ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली

बाळासाहेबांच्या विचारांशी आम्ही कायम आहोत आम्ही त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत पण तुम्ही भरकटलात. याकूब मेमनला फाशीची शिक्षा दिली पण ती शिक्षा रद्द करणाऱ्या आमदाराला तुम्ही मंत्रिपद देता... मुंबईकरांच्या जखमेवर किती मिठ चोळणार.. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली... मग गद्दारी कुणी केली ही जनता तुम्हाला यासाठी माफ करणार नाही.

आमची गद्दारी नाही गदार आहे; गदार म्हणजे क्रांती 

आम्हाला तुम्ही गद्दार म्हणता पण आम्ही गद्दार नाही तर आम्ही गदार आहोत आम्ही क्रांती केली आहे. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता मग आम्ही तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही सामान्य जनतेशी गद्दारी केली.

ही शिवसेना ना उद्धव यांनी ना एकनाथाची ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची 

शिवसेना वाचवण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांना वाचवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जर आम्ही चुकलो असतो तर हा जनसागर आला असता का? ही शिवसेना ना ठाकरेंची ना शिंदेंची ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आहे.

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना जपण्यासाठी बाहेर पडलो 

बाळसाहेबांचे विचार जपण्यासाठी आम्ही ही जाहीर भूमिका घेतली. तुम्ही शिवसेनेचा रिमोट राष्ट्रवादीच्या हाती दिला. तुम्ही त्यांच्या तालावर नाचायला लागला आणि आम्हालाही नाचायला लावलात ते आम्हाला सहन नाही झालं म्हणून आम्ही बाहेर पडलो.

तुम्हीच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली 

राज्यभरातून आज प्रतिसाद मिळतोय. शेवटचा माणूसही दिसत नाहीय. आज खरा महासागर इथ दिसून येतोय. खरी शिवसेना कुठे याचं उत्तर आज या महासागराने दिलं आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवतीर्थ मिळवलं पण मी या मैदानात हस्तक्षेप केला नाही. मैदानही आम्हाला मिळालं असत. कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे.

आनंद दिघे मोठे होताना दिसले तेव्हा त्यांच्याकडून राजीनामा मागितला; त्याचा मी साक्षीदार 

अनेक पावसाळे आम्ही पहिले कोणी मोठं होताना दिसलं की राजीनामा मागायचा . आनंद दिघे मोठे होताना दिसले तेव्हा त्यांच्याकडून राजीनामा मागितला; त्याचा मी साक्षीदार आहे असं रामदास कदम यांनी म्हंटलं आहे. माझ्यापेक्षा जास्त टाळ्या कोणाला मिळाला तर त्यांना परत बोलवू नका त्याला मोठं होऊ देण्याची त्यांची भावना नाही.

कोण आहे हा दाढीवाला; 33 देशांनी घेतली या माणसाची दखल 

मी अलीबाबा चाळीस चोर असा चित्रपट पहिला होता त्यांनी चोरी केली पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेतील वेगळ्या विचारांचे 40 आमदार पळवले. राज्यात ही घटना घडल्यानंतर सगळे म्हणायला लागले कोण आहे हा दाढीवाला त्यानंतर 33 देशांनी या माणसाची दखल घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नायक 

मी एकदा एक चित्रपट बघितला होता एक दिवसाचा मुख्यमंत्री त्याच नाव होतं नायक पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॉँग्रेस, राष्ट्रवादीसाठी बनतील खलनायक

हाथ दाखवा गाडी थांबवा असा आमचा मुख्यमंत्री- गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी बोलताना आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. इतिहास माहिती असून काही होत नाही तह करावा लागतो. आम्ही उद्धव यांना सांगितल तह करा पण उद्धव ठाकरे यांनी आमच ऐकलं नाही. आम्ही बाळासाहेब यांचे वारसदार नाही, पण हिंदुत्वाच्या वारसदार यादीत आमच्या 40 आमदारांची नावे नक्कीच असेल. तुमचं नाव कॉँग्रेसच्या यादीत असेल. आम्ही बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यांना आम्ही करोना काळात मुलाला बाहेर फिरवा पण त्यांनी ऐकलं नाही, ये पिल्लू टिल्लू असं केलं. आम्हाला सामूहिक विचारांचा आणि निर्णय घेणारा मुख्यमंत्री हवा आहे.

जयदेव बाळासाहेब ठाकरे शिंदेच्या मेळाव्यात 

जयदेव बाळासाहेब ठाकरे यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच कौतुक केलं आहे. हा कष्टकरी आहे, या नाथाला एकटा नाथ बनवी देऊ नका, त्याला एकनाथच राहू द्या असंही जयदेव यानी म्हंटलं आहे.

51 फूटी तलवारीचं पूजन करून शिंदे गटाच्या मेळाव्याला सुरवात 

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या तलवारीची नोंद करण्यात आली आहे. या तलवारीचं पूजन करून शिंदे गटाच्या मेळाव्याला सुरवात झाली आहे.

जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते शिंदेंनी करुन दाखवलं- शरद पोंक्षे

बाळासाहेब यांनी एक स्वप्न पाहिलं ते म्हणाले माझा मुख्यमंत्री होईल तेव्हा मी मशिदीवरचे भोंगे काढीन, औरंगाबादच नाव संभाजीनगर करेन ते उद्धव ठाकरे यांनी केलं नाही पण माननीय मुख्यमंत्री यांनी ते करून दाखवलं असं शरद पोंक्षे यांनी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानात दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानात दाखल झाले आहेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची सुरवात शहाजीबापू पाटील यांच्या भाषणाने झाली आहे.

'काय ती गर्दी, काय ती लोकं एकदम...' शिवाजी पार्क झाला फुल्ल!

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला गर्दी वाढतच आहे. VIP गेट मधून राज्यातून आलेले शिंदे गटाचे समर्थक पोलिसांना डावलून आत शिरले आहेत. VIP गेट मधून जिल्हा प्रमुख,शहर प्रमुख,तालुका प्रमुख,विभाग प्रमुख यांच्यासाठी ठेवण्यात आली होती एन्ट्री गेट मधून जबरदस्ती आत शिरले आहेत

उद्धव साहेब केलेलं पाप कसं धुणार; शहाजीबापू पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल

शेतीचे दु:ख आम्हाला माहिती आहे. दिवसभर खुरपून आलेल्या आईचा खांदा किती दुखतो आणि ती तिच्या लेकीला सांगते की माझी सेवा कर...या साऱ्या वेदना शिंदे साहेबांना माहिती आहे. ते दिवसभर रिक्षा चालवायचे, जीवनभर त्यांनी संघर्ष केला. त्या माणसाला राज्याच्या प्रश्नांविषयी नव्यानं सांगण्याची गरज नाही ठाकरे यांनी जनतेकडे लक्ष्य दिले नाही असा आरोप शहाजीबापू पाटलांनी केला आहे.

शरद पवार मैद्याच पोतं; शहाजीबापू पाटील यांची मविआ सरकारवर टीका 

बीकेसी मैदानावर मेळाव्याच्या भाषणाची सुरवात शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. भाषणाला सुरवात करताच पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. तर शरद पवार यांच्यावरतीही टीका केली आहे. फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांची सभा नेहमी टीव्हीवरुन पाहिली आहे. शिवसेना प्रमुख कुणाला मैद्याचं पोतं म्हणाले, शरद पवार, तुम्ही बिनधास्त नाव घ्या अजिबात लाजू नका. ममद्या म्हणाले होते. याची आठवण शहाजी पाटील यांनी यावेळी करुन दिली आहे. अडीच वर्ष राज्याचे तुकडे केले आहेत. आता आणखी काय करणार आहात असा सवालही शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

बीकेसी मैदानावर जाण्यासाठी रांगेत लागली वाहणे

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळजवळ 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा रस्त्यावर पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरुन बीकेसी मैदानाकडे रवाना 

एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला थोड्या वेळात सुरवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावरुन BKC मैदानाकडे रवाना झाले आहेत.

मेळाव्यात छाप कुणाच्या भाषणाची? दोन्ही गटांकडून 11 वक्ते गाजवणार सभा

एकनाथ शिंदे यांचा मेळावा काही वेळातच सुरू होणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, रामदास कदम, शहाजीबापू पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भावना गवळी, संदीपान भूमरे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे हे नेते भाषण करणार आहेत. यामध्ये कोणाच्या भाषणाची छाप पडणार हे थोड्याच वेळात समजेल.

स्मीता ठाकरे खास आग्रहास्तव शिंदेंच्या दसरा मेळाव्याला हजर

बीकेसी मैदानावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली आहे. उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. स्मीता ठाकरे खास आग्रहास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला हजर राहिल्या आहेत. शिवसेनेतील महासंग्राम आज मुंबईत पाहायला मिळणार आहे.

बीकेसी मैदानावर अवतरले प्रति बाळासाहेब

बीकेसी मैदानावर प्रति बाळासाहेब यांनी उपस्थिती लावली आहे. सातारा जिल्ह्यातील सत्तरीतील भगवान शेवडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी बीकेसीवर दाखल झाले आहेत. मैदानावर दाखल झाल्यानंतर भगवान शेवडे यांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

गर्दी वाढवण्यासाठी काय पण! शिंदेंच्या मेळाव्याला पुण्यातून निघाले परप्रांतीय

पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यांची सध्या उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा सालाबादप्रमाणं शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये पार पडणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला ३ लाख लोक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण ही गर्दी जमवण्यासाठी कोणालाही पकडून आणलं जात आहे. याचा प्रत्यय पुण्यात आला आहे. पुण्यातून बीकेसीकडं सकाळी एक बस निघाली होती या बसमध्ये काही लोक होते जे अमराठी आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. हे लोक बहुतेक पुण्यात काम करणारे बिहारी कामगार आहेत.

बीकेसी मैदानावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी 

बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत आहे. 7 वाजता एकनाथ शिंदे मैदानावर उपस्थित राहणार आहेत. 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरवात होणार आहे. त्याआधी येथे जमलेलेल्या कार्यकर्त्यांच्या मनोरंजनसाठी पोवाडे गीते इत्यादि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अवधूत गुप्ते यांची गीते चालू आहेत.

शिंदेंच्या दसरा मेळाव्या कोण कोण भाषण करणार?

एकनाथ शिंदे यांचा मेळावा काही वेळातच सुरू होणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, रामदास कदम, शहाजीबापू पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भावना गवळी, संदीपान भूमरे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे हे नेते भाषण करणार आहेत.

बीकेसी मैदानावरील व्यासपीठावर बाळासाहेबांसाठी खुर्ची 

काही वेळातच बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला सुरवात होणार आहे. शिंदे काही वेळातच मैदानावर दाखल होतील परंतु व्यासपीठावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी राखीव खुर्ची ठेवण्यात आली आहे. त्यावर भगवी शाल आणि चाफ्याच्या फुलांचा हार ठेवण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर काही वेळात सुरू होणार आहे.गर्दी जमविण्यासाठी दोन्ही बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. हळूहळू मैदानावर गर्दी जमायला लागली आहे. दोन्ही गटांच्या मेळाव्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे.राज्यभरातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तयारी केली आहे. बीकेसी मैदानावर सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

शिवसेनेतील 2 खासदार, 5 आमदार फुटले? 

शिवसेनेचे आमदार फोडण्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. शिवसेनेतील 2 खासदार आणि 5 आमदार फुटले असल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे. आजच्या दसरा मेळाव्यात हे आमदार खासदार शिंदेंच्या नेतृत्वात सहभागी होणार असल्याचा दावाही तुमाने यांनी केलाय.

दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे यांचा ठाकरेंवर निशाणा

दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे,जो उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे, हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळीं ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()