CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या दावोस किस्स्यावर पंतप्रधान काय म्हणाले? शिंदेंनी आज सांगितलं

CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde Newsesakal
Updated on

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी काल गुरुवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी एकनाथ शिंदे भाषणादरम्यान मोदींच्या लोकप्रियतेवर बोलले. त्यांनी सांगितलेला दावोस किस्सा ऐकून पंतप्रधानांनाही हसू आवरलं नव्हतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

दावोसमध्ये विविध देशातले लोक आले होते. मला अनेक लोक भेटले. काही पंतप्रधान होते काही मंत्री होते. ते फक्त आणि फक्त मोदींबद्दल विचारायचे. एक पंतप्रधान भेटले, मला म्हणाले मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत त्यांनी फोटो घेतला आणि म्हणाले मोदींना हा फोटो दाखवा. जर्मनी, सौदीचे लोक भेटले ते म्हणाले तुम्ही मोदीजींसोबत आहात ना? मी म्हणाले आम्ही त्यांचेच लोक आहोत. मोदींचा करिष्मा जगभरात पसरला असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचाः मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भाषणादरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हसू आवरलं नव्हतं. उपस्थित लोकांनीही मोदी..मोदी..च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. काल आणि आज दिवसभर हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

बीकेसीतल्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानकातून मेट्रोचं लोकार्पण केलं. त्याहीवेळी पंतप्रधान मोदी एकनाथ शिंदेंना काहीतरी बोलले आणि एकच हशा पिकला. त्याच मुद्द्यावरुन आज एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

CM Eknath Shinde News
Shiv Sena Symbol Hearing : युक्तिवाद सुरु असतांना कामकाज काही काळासाठी थांबवलं

एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांनी माझ्या दोवोसच्या किस्स्याला भरभरुन दाद दिली. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं शिंदेंनी सांगितलं.

पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असल्याचा विश्वास लोकांमध्ये आहे. दररोज इतर पक्षांचे सरपंच आपल्याकडे येत आहेत.

  • मोठ्या प्रमाणावर लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येत आहेत

  • लोकहिताचे निर्णय बघून राज्यातील सरपंच विश्वास दाखवत आहेत

  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं. मुंबईतल्या विकासाला काल खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

  • मुंबईच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या भाषणाला दिलखुलास दाद दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.