मुंबई - Vedanta Foxconn Project : राज्यातील राजकीय वातावरण वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर या मुद्द्यावरून विरोधक जोरदार टीका करत आहे. विरोधकांच्या टीकेनंतर नवीन सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सामंत केवळ सारवासारव करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
उदय सामंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, मागच्या सात-आठ महिन्यांत हवा असलेला प्रतिसाद उद्योजकांना मिळाला नसल्याचं म्हटलं. तसचं सामंत म्हणाले की, सत्तांतराच्या अवघ्या दोन महिन्यात प्रकल्प गुजरातला जावू शकत नाही.
एकीकडे सामंत म्हणतात, दोन महिन्यात प्रकल्प गुजरातला जावू शकत नाही. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री स्पष्ट म्हणताना दिसतात की, वेदांता प्रकल्प लवकरच महाराष्ट्रात येत आहे. केवळ २१ दिवसांपूर्वी त्यांनी हे विधान केलं होतं. अर्थात त्यांच्या या विधानामुळे वेदांता प्रकल्प २१ दिवसांतच गुजरातला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची घोषणा खरी होती की, उद्योगमंत्री सामंत खरं बोलतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून शिंदे आणि सामंत यांच्यात ताळमेळ नसल्याचं स्पष्ट होतं आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर वेदांता प्रकल्पावरून जोरदार टीका करत आहेत. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गुंतवणूक यायला हवी. मात्र महाराष्ट्रासारखं राज्य आपण मेरीटवर पुढं आणण्याचा प्रयत्न केला. सध्याचे मुख्यमंत्री ४० आमदारांसह दोन प्रकल्पही तिकडे घेऊन गेल्याची टीका आदित्य यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.