Eknath Shinde : महाबळेश्वरमधील दरे गावच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस सातारा दौऱ्यावर; गावात उत्साहाचं वातावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे (ता. महाबळेश्वर) गावच्या यात्रेसाठी साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
CM Eknath Shinde visit to Mahabaleshwar
CM Eknath Shinde visit to Mahabaleshwaresakal
Updated on
Summary

महाबळेश्वर तालुक्यातील दरे (Dare Mahabaleshwar) तांब उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तवेश्वर यात्रा भरते.

भोसे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे (ता. महाबळेश्वर) गावच्या यात्रेसाठी साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री (Eknath Shinde) झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा यात्रेसाठी आल्याने गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. ढोल ताशांच्या गजरात गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

महाबळेश्वर तालुक्यातील दरे (Dare Mahabaleshwar) तांब उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तवेश्वर यात्रा भरते. यासाठी मुख्यमंत्र्यांचे मंगळवारी सायंकाळी आगमन झाले. बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा होणार आहे. गावच्या यात्रेशिवाय मुख्यमंत्र्यांचा दुसरा कोणताही कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

CM Eknath Shinde visit to Mahabaleshwar
राज्यसेवा परीक्षेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरानं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक; उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न झालं पूर्ण

परिसरातील ग्रामस्थांच्या व साताऱ्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि शेत शिवार भेट असा कार्यक्रम आहे. सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.

CM Eknath Shinde visit to Mahabaleshwar
MPSC Exam : दोनवेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश! बोरगावच्या पूजा वंजारी 'एमपीएससी'त मुलींमध्ये प्रथम

सातारा पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, वाईचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचिंम, मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक प्रवीण भिलारे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग व सेंद्रिय शेती केली आहे. त्यांची पाहणी ते करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शेतात स्ट्रॉबेरी, सुपारी, लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, मिरची, हळद अशी पिके घेतली आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबर शिंदे गटाचे नेते आज स्वागतासाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.