Eknath Shinde : 'मी अजितदादांबरोबरच' म्हणणाऱ्या अण्णा बनसोडेंची मुख्यमंत्र्यांनी का घेतली भेट?

eknath shinde
eknath shinde esakal
Updated on

पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अजित पवार यांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे हे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी थेट बनसोडे यांच्या कार्यालयात जात त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उत आला आहे.

मागे जेव्हा अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तेव्हा अण्णा बनसोडे यांनी 'मी अजितदादांबरोबरच' असं म्हणून चर्चा घडवून आणली होती. शिवाय बैठकीसाठी आम्ही मुंबईला निघालो आहोत, असंही बनसोडे म्हणालेले. त्यांच्या विधानाने अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. परंतु नंतर अजित पवारांनीच त्या वावड्या होत्या, असं स्पष्ट केलं.

eknath shinde
Police Inspector Transfer : पोलिस दलात फेरबदल! राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांच्या कट्टर कार्यकर्त्याला भेटायला जातात आणि बातचित करतात, यामागे नेमकं राजकारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आज शुक्रवारी (ता. १६) आमदार बनसोडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमात एकत्र दिसून आले. यावेळी बनसोडे यांच्या गळ्यात भगवी शाल आढळली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. यामुळे बनसोडे आगामी काळात शिवसेनेच्या वाटेवर तर नाहीत ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अण्णा बनसोडे हे पहाटेच्या शपथविधीचेही साक्षीदार आहेत.

eknath shinde
Devendra Fadnavis : "मोदीजींनी लस तयार केली, नाहीतर कटोरा घेऊन उभे असतो", देवेंद्र फडणवीसांचे अजब विधान

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मूळ शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग पहायला मिळालं. अजूनही अनेक नेते पदाधिकारी शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करत आहेत. अण्णा बनसोडे हेदेखील पक्ष बदलणार का? अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत. भगवी शाल आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयात अवतरतात म्हटल्यावर चर्चा तर होणारच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.