मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नावर ठराव मांडणार आहेत.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Karnataka-Maharashtra Border Dispute) आता चांगलाच पेटत चालला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं आहे. त्यातच आता महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळंच नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गाजणार हे स्पष्ट झालंय.
कामकाज सल्लागार समितीची काल बैठक पार पडली. त्यात अधिवेशनाचा कार्यक्रम आणि कालावधी यावर शिक्कामोर्तब झालं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावासीय मराठी जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या अखंडतेसाठी महाराष्ट्र सरकार कायमच पाठीशी असल्याचा ठराव मांडण्याची सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली. त्यावर सर्वांनी संमती दर्शवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नावर ठराव मांडणार आहेत. त्याचप्रमाणे 21 विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार आहेत. हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर ते 30 डिसेंबर असे फक्त 12 दिवस चालणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळं नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकलं नव्हतं. यंदाचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे.
विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.