Eknath Shinde News : CM शिंदेंचं काम जोमात; तीन दिवसांत ६५ फाईल्स निकाली

CM Eknath Shinde working from home cleared 65 files in three days from Dare Village maharashtra politics
CM Eknath Shinde working from home cleared 65 files in three days from Dare Village maharashtra politics
Updated on

राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबद्दल विधाने केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र सातारा येथे त्यांच्या दरे (महाबळेश्वर) गावी सुट्टीवर गेले आहेत. उलटसुलट चर्चा सुरु असतानाच शिंदेंनी त्यांच्या कामतून विरोधकांना चोख उत्तर दिलं आहे.

सुट्टीवर गेल्याच्या चर्चांदरम्यान शिंदें यांनी तीन दिवसात ६५ फाइली निकाली काढल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुट्टीवर गेले असून ते नाराज असल्याचे विरोधकांकडून म्हटलं जात होतं. याला उत्तर देताना आम्ही टीकेला टीकेतून उत्तर देणार नाही. कामातून उत्तर देणार आहोत असे शिंदे म्हणाले होते.

CM Eknath Shinde working from home cleared 65 files in three days from Dare Village maharashtra politics
Amruta Fadnavis : मला नरडं आहे, त्यांना गळा...; अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

मुख्यमंत्री कार्यालयाने नुकतेच जाहीर केलेल्या एका निवेदनात शिंदे यांनी तीन दिवस ६५ फाइल्सचा निपटारा केल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या गावी असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत.

CM Eknath Shinde working from home cleared 65 files in three days from Dare Village maharashtra politics
Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ११ वाहनांचा विचित्र अपघात; अनेक जण जखमी

मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित नसताना सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्समधील विषय मार्गी लावल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने संबंधितांना सूचनाही दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - Types of Vedas: वेदांचे प्रकार

CM Eknath Shinde working from home cleared 65 files in three days from Dare Village maharashtra politics
Mukesh Ambani : निष्ठावान सहकाऱ्याला अंबानींचं जम्बो गिफ्ट! दिलं १५०० कोटींचं घर

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला होचा. राऊतांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान ही चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन ते गावी निघून गेल्याचे देखील बोलले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.