Eknath Shinde Ayodhya Visit : सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी CM शिंदेंसह ४० आमदारांचे रामाला साकडे

ठरलं! CM शिंदे ४० आमदारांसह 'या' दिवशी जाणार अयोध्या दौऱ्यावर
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह येत्या 9 एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसेच यावेळी ते शरयू नदीची आरती देखील करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. या सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अयोध्येच्या दौऱ्याबाबतची माहितीही दिली आहे.

एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले कि, ''अयोध्या आणि शिवसेनेचे अनेक वर्षांपासूनच एक नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच राममंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाचीही मी पाहणी करणार आहे. अयोध्या आमच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही याकडे राजकारण म्हणून कधी पाहिलं नाही आणि पाहणार देखील नाही'', असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Eknath Shinde
Ramdas Kadam: 'रामदास कदमांच्या पराभवाच्या आदल्या रात्री कुत्री रडत होती', राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या 'वज्रमुठ' सभेवर 'वज्रझुठ' सभा आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, ''सत्तेला हपापलेली खोटारडी लोक एकत्र आली आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध ते करणार का?'', असा प्रश्नही यावेळी त्यांनी केला आहे.

अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाऊन रामाला साकड घालणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Eknath Shinde
Congress: काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान दुर्घटना; अचानक कोसळलं स्टेज video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.