Maratha Reservation : धोरण आखलं आहे...; EWS जाहिरातीवरील टीकेनंतर बदलला सरकारचा सूर, आज पुन्हा...

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यात मागील काही दिवसांपासून आंदोलने होत आहेत. यादरम्यान राज्य सरकारकडून राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिराती चर्चेचा विषय ठरत आहेत. काल (रविवार) मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेल्या या EWS संबंधीच्या जाहिरातीवर टीका केली होती. दरम्यान या जाहिरातीनंतर आज राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जाहिरात दिली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी दिलेला वेळ संपत आला आहे. यानंतर जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली असून त्यांनी २४ तारखेच्या आत मराठा आरक्षणाता निर्णय घेतला नाहीत तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

यादरम्यान राज्य सरकारकडून काल इडब्लूएसबद्दल एक विस्तृत जाहिरात वृत्तपत्रात देण्यात आली होती. या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. मनोज जरांगे यांनी देखील या जाहिरातीवरून राज्य सरकारवर टीका केली होती. यानंतर आज राज्य सरकारने पुन्हा नवीन मराठा आरक्षणाबद्दलची जाहिरात वृत्तपत्रात दिली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा समाजाची आरक्षणाची मागणी अ्न सरकारनं दिली EWS ची जाहिरात!

जाहिरातीत काय म्हणटलंय?

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मराठा आरक्षणासाठी धोरण आखले असल्याचे सांगण्यात आले आहे. "धोरण आखले आहे..तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे. पुनःश्च... मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे." असा मजकूर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह छापण्यात आला आहे.

Maratha Reservation
Israel-Hamas War: इस्राइलचा तोफगोळा चुकून इजिप्तच्या ठिकाणावर पडला; युद्धाला लागणार वेगळे वळण?

जरांगे काय म्हणाले होते?

काल जालन्याच्या अंतरवली सराटी गावात आयोजित बैठकीत बोलताना, EWS आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जाहिरातीबद्दल जरांगे म्हणाले होते की, ईडब्ल्यूएस आरक्षण कुणी मागितलं होतं? बाकीच्यांनाही सारथीसारख्या संस्था आहेत. मग मराठ्यांना वेगळं काय सांगता? मराठ्यांचा आरक्षणाचा विषय आला की ईडब्ल्यूएसचा मुद्दा काढला जातो, मात्र या आरक्षणाचा फायदा सर्वांनाच होतो, आमची मागणी मराठा समाजाबद्दलची आहे. दरम्यान कालच्या जाहिरातीमध्ये सरकारने EWS मार्फत असलेल्या आरक्षणाची सविस्तर माहिती जाहिरातीत दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.