राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख नुकतेच निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यानुसार येत्या २० नोव्हेंबरर रोजी राज्यातील २८८ विधानसबा जागांसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याग करण्यासाठी सूचीत करणाऱ्यांनी शिवसेनेच्या धाडसी आणि क्रांतीकारक ऐतिहासिक उठावाची जाणीव ठेवावी असे संतप्त प्रतिक्रिया शिवसेना आमदारांनी दिली आहे.