'पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय, यामागे कोण हे शोधून काढा'

नेत्यांच्या कुटुंबावर हल्ला करणं हा राज्यातील राजकारणाचा पायंडा नाही - CM ठाकरे
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray e sakal
Updated on
Summary

नेत्यांच्या कुटुंबावर हल्ला करणं हा राज्यातील राजकारणाचा पायंडा नाही - CM ठाकरे

राज्यात चालू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलन आता आणखी चिघळले आहे. उच्च न्यायालयाने (High Court) काल एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाची मागणी फेटाळत २२ एप्रिलपर्यंत त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यातील काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करत आज एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवर दगडफेक, चप्पलफेक केली आहे. दरम्यान, आता यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनीही याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा अतिशय निंदनीय असल्याचं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

यावेळी ते म्हणाले, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय असुन पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे कोण हे शोधून काढा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. नेत्यांच्या कुटुंबावर हल्ला करणं हा राज्यातील राजकारणाचा पायंडा नाही, असंही ते म्हणाले आहेत. नेत्यांच्या घरावर हल्ला हे शोभनीय नसून आज या घटनेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

Uddhav Thackeray
गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, याप्रकरणी आज महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. न्याय मागण्यासाठी घरात घुसणे ही पद्धत नाहीच. जर असेल तर त्यापुढे तुमच्या घरात सुद्धा असेच घुसावे का? मंत्रालय, पक्षाचे ऑफिस आहेत ना तुमचे आंदोलन करण्यासाठी तिथे का आंदोलन केले नाही. याच्यामागील कर्ते करवणारे यांच्यावर कडक करावी झालीच पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे शरद पवार यांच्या निवासस्थान परिसरात एकीकडे हा गोंधळ सुरु असताना संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच १२ तारखेला १२ वाजवणार असल्याचा इशारा दिला आहे.तर काही जणांनी एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन हा भाजपचा पुर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवत आंदोलकांना पोलिस व्हॅनमध्ये भरुन पुन्हा आझाद मैदानात सोडले.

Uddhav Thackeray
शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी १०७ जणांवर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.