मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून वाद; 'मविआ'चं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySakal
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहिले नाहीत यावरुन भाजपने (BJP) रान उठवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आलेले नाहीत, राज्याचे मुख्यमंत्री मागील जवळपास ७० दिवसांपासून कोणालाही उपलब्ध नाहीत,’’ अशी टीका केली आहे. या टीकेला खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे.

‘अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा’

कोल्हापूर : ‘‘राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काल कोरोनासंबंधीच्या देशव्यापी बैठकीलाही मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली पाहिजे,’’ असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

CM Uddhav Thackeray
दिल्लीत लस न घेतल्याने ७५ टक्के मृत्यू; आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची माहिती

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. ‘‘नशिबाने काल परवा प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याने आपल्या दृष्टीची चिंता करू नये.

ती तपासायला भाजपचे नेतृत्व समर्थ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपद मिळवले पण उपाध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार कसा पडला हे त्या पक्षाला समजत नाही. तुम्हाला संपविण्याचा डाव चालू असून त्यात तुम्ही फसत चालला आहात. त्याची आधी चिंता करा,’’ असा टोला पाटील यांनी लगावला.

‘मुख्यमंत्री व्यवस्थित काम करीत आहेत’

मुंबई : ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नियमित कार्यरत आहेत. झूम मिटिंगद्वारे ते सर्व बैठकांना उपस्थित असतात आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते हजर असतात, असा खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे यांची पाठराखण करताना ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री झूमवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित होते. त्यामुळे त्यांचे काम कुठे अडले आहे, असे मला वाटत नाही. ते व्यवस्थित काम करीत आहेत.’’

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना पाटील म्हणाले, की देशातले वातावरण शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर झपाट्याने बदलत आहे. लोक पर्याय शोधत आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसचा पर्याय निवडत आहेत. काही ठिकाणी समाजवादी पक्षाचा पर्याय निवडत आहेत. भाजपला सोडून मतदार दुसऱ्या बाजूला झुकलेला आहे. उत्तर प्रदेशात तर मंत्री आणि काही आमदार पक्ष सोडून चालले आहेत. मुंबै बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडी एकत्र आली आहे, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले.

CM Uddhav Thackeray
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय

‘आरोग्यमंत्र्यांची उपस्थिती गौण आहे का?’

उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने ते पंतप्रधानांबरोबरील ऑनलाइन बैठकीत सहभागी होऊ न शकल्याने मुख्‍यमंत्र्यांनी कार्यभार अन्य नेत्यांकडे सोपवावा, या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते, त्यांना कमी का लेखता?, असा सवाल केला. पंतप्रधानदेखील कधीतरी कोणत्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे होऊ शकते.

पण मुख्यमंत्री का उपस्थित नव्हते यावर आवश्यक असेल तर सचिवालय अधिक खुलासा करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘‘भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय दुसरे काही नाही. भाजपने चीनने केलेल्या घुसखोरीबाबत बोलले पाहिजे. या संपूर्ण देशात कुठले राज्य व्यवस्थित असेल तर महाराष्ट्रच आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अन्य नेत्यांच्या चष्म्याचा नंबर मला तपासावा लागेल,” असं संजय राऊत खोचक शेरा राऊत यांनी मारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.