आरोग्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; भातखळकर यांची मागणी

Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkarsakal media
Updated on

मुंबई : अहमदनगरच्या (ahmadnagar) शासकीय रुग्णालयातील (government hospital) अग्निकांड प्रकरणी (fire incidents) आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी (police FIR demands) भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. 11 बळी घेणारी ही दुर्घटना म्हणजे हत्याकांड असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Atul-Bhatkhalkar
कोरोनानंतर मुंबई महापालिका रुग्णालये होणार आणखी सुसज्ज

भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या वेळी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर करून दहा महिने उलटून गेले. तरीही महाविकास आघाडी सरकारने त्यातील एकाही सूचनेची अंमलबजावणी केली नाही. त्याचमुळे अहमदनगर येथील हत्याकांड घडल्याचेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

या अकरा रुग्णांच्या मृत्यूस केवळ महाभकास आघाडी सरकार जबाबदार आहे. ही दुर्घटना नसून आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड आहे. नऊ जानेवारी रोजी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आग लागल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने जानेवारीमध्येच सरकारला अहवाल दिला होता. राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये तात्काळ सुधारणा करण्यासाठी त्यात अत्यंत महत्वाच्या 15 सूचना केल्या होत्या. परंतु त्यातील एकाही सूचनेची ठाकरे सरकारने अंमलबजावणी केलेली नाही, असाही आरोप भातखळकर यांनी केला आहे.

Atul-Bhatkhalkar
कोरोनानंतर मुंबई महापालिका रुग्णालये होणार आणखी सुसज्ज

केवळ वसुली व टक्केवारी मध्ये मग्न असलेल्या सरकारने एकाही शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडीट केले नाही. कोणत्याही शासकीय रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी व सुधारण्यासाठी निधी दिला नाही. मागील वर्षभराच्या काळात सात रुग्णालयांमध्ये आग लागून 78 रुग्णांचा बळी गेला. प्रत्येक अग्निकांडानंतर ‘आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे’, ‘चौकशी करून दोषींवर कारवाई करू’ अशी मोघम व वेळकाढू वक्तव्ये करायची, परंतु प्रत्यक्ष कृती करताना हाताला लकवा मारल्याप्रमाणे थंड राहायचे असा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने चालविला आहे. मुख्यमंत्री महोदय, आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेतल्यावर आपल्या सरकारला व मंत्र्यांना जाग येणार आहे ? हे सांगा अशा शब्दांत भातखळकर यांनी जाब विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.