'मराठी आणि गुजरातीचं नातं आणखी दृढ व्हावं': उद्धव ठाकरे

मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या २०० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.
Modi Thackeray
Modi ThackeraySakal
Updated on

मुंबई : मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठी आणि गुजरातीचं नात आणखी दृढ व्हावं अशी आशा व्यक्त केली आहे. गुजराती आणि मराठी दुधात साखर विरघळल्यासारखी आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

(CM Uddhav Thackeray)

मुंबई समाचार वृत्तपत्राचा २०० वा वर्धापनदिन मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी फडणवीस यांना आपले मित्र म्हणून उल्लेख केला आहे. "पुढील १०० वर्षे या वृत्तपत्राचं नरेंद्र मोदी यांच्या हाताने लोकार्पण व्हावं आणि आपलं जे गुजराती आणि मराठीचं नातं आहे ते अधिकाधिक दृढ होत जावं." असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Modi Thackeray
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसण्यापासून रोखलं; उद्धव ठाकरेंची नाराजी

"मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे आणि कामा साहेब आमच्या कुटुंबातील असल्यासारंखं मी मानतो पण मी गुजराती समजू शकतो बोलू शकत नाही. आणि एखाद्या वृत्तपत्राला २०० वर्षे होतात यावर मला विश्वास बसत नाही." असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. "मला अभिमान आहे महाराष्ट्रात २०० वर्षे गुजराती वृत्तपत्र यशस्वी वाटचाल करतंय आणि हेच तर आपलं नातं आहे. गुजराती आणि मराठी दुधाच साखर मिसळल्यासारखं आहे." असं मत त्यांनी व्यक्त करत मराठी गुजराती भाषेतील नातं दाखवून दिलं आहे.

"भारताच्या २०० वर्षापूर्वीचा इतिहात या वृत्तपत्राच्या कार्यालयात आपल्याला मिळेल. काही वृत्तपत्र चळवळीच्या वेळी जन्म घेतात. आजसुद्धा केसरी १४१ वर्षापासून चालू आहे, वर्तमानपत्र ऐतिहासिक कामं करत असतात." असं ते म्हणाले आहेत.

Modi Thackeray
'या' शेअरचा एका महिन्यात 63% परतावा; तोट्यातून साकारला फायदा

"मुंबई समाचार वृत्तपत्राचं दालन केलं तर महाराष्ट्राच्या क्रांतीच्या पाऊलखुणा त्यामध्ये सापडतील. आत्ता २०० वर्षे झाली आहेत, पुढचेही २०० वर्षे हे वृत्तपत्र यशस्वी वाटचाल करणार आहे." असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.