हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्री उपस्थित राहणार का?

CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackerayTeam eSakal
Updated on

मुंबई : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) सुरू आहे. संपूर्ण अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) उपस्थिती दिसली नाही. पण, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक (Maharashtra Assembly Speaker Election) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री विधानभवनात येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री आजारी आहेत, फडणवीसांना मुख्यमंत्री करावं: आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला किंवा सभेला उपस्थिती दर्शवली नव्हती. मुख्यमंत्री राज्यात फिरत नाही, असा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातो. तसेच मुख्यमंत्री अधिवेशनात देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली जात होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी तसा सल्ला दिला होता. त्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच मुख्यमंत्री अधिवेशनात कधी येतील? असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली असून ते त्यांच्यावेळी विधानभवनात हजेरी लावतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आज अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहतात की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

...तर मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहणं गरजेचं -

आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला, तर प्रथेप्रमाणे अध्यक्षांना विराजमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महत्वाची असते. आज अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सरकार ठाम -

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून, आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. एकीकडे राज्यपालांनी ठाकरे सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नियमात केलेले बदल यावर आक्षेप घेतला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे. राज्यपालांकडून सरकारच्या कायद्यांवर अविश्वास दाखवला. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पत्रात निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम असल्याचही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कायदे मंडळाने काय कायदे केले, ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावलय. त्याचमुळे ठाकरे सरकार विधानसभा सभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यावर ठाम असून, सोमवारी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक विधान भवनातील समिती कक्षात पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई तसेच इतर मंत्री, मुख्य सचिव आणि सचिवही उपस्थित होते. या बैठकीत आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणारच अशी भूमिका सरकारने घेतली आहे. जर ही निवडणूक झाली तर मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.