"संभाजी महाराज आपल्या हृदयात, स्मारक ठाव घेणारे पाहिजे"; मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुण्यातील तुळापूर वढू येथील समाधीस्थळाच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySakal
Updated on

पुणे : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची समाधी असलेल्या तुळापूर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिखर समितीच्या बैठकीत दिले आहेत. शिरूर तालुक्यातील वढू आणि हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात येणार असून याबाबतचे महत्त्वाचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

(Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Tulapur)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित केलेल्या शिखर समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, अमोल कोल्हे, आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी "स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच, त्यांचे स्मारक देखील पाहता क्षणीच मनाचा ठाव घेणारे, आकर्षक आणि भव्य असावे." असे निर्देश दिले आहेत.

CM Uddhav Thackeray
"...अन् मी त्यांचा दीर झालो"; काय घडलं वसंत मोरेंसोबत?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तरूणांमध्ये गडकिल्ले आणि ऐतिहासिक वस्तूबद्दल मोठी आस्था आहे. अशा ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या बाबींचा विचार करून आकर्षक स्मारक व्हायला पाहिजे. तसा आराखडा करून पुन्हा शिखर समितीकडे सादर करावा असं अजित पवार म्हणाले.

या स्मारकाच्या ठिकाणी जयंती आणि बलिदान दिन या दोन्ही दिवशी शिवभक्तांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अशा वेळी पर्यटकांना सर्व सोयी उपलब्ध व्हायला हव्यात त्या गोष्टींचा विचार करून आराखडा बनवण्यात यावा असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आराखड्याचे सादरीकरण केले आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

CM Uddhav Thackeray
राज्यातील गळीत हंगाम पूर्ण; विक्रमी साखर उत्पादन करणारा भारत हा जगात प्रथम

सादर केलेल्या आराखड्यात भव्य शिल्प, अॅम्फीथिएटर, संग्रहालय, प्रकाश शो, सौर उर्जा प्रकल्प, अग्निशामक यंत्रणा, संरक्षण भिंत, प्रेक्षागृह, रेन वॉचर हार्वेस्टिंग, सध्याच्या समधीचा जिर्णोद्धार अशा कामांची यादी दिलेली आहे. सर्वांच्या सहमतीनंतर हा आराखडा फायनल केला जाणार आहे. दरम्यान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच, त्यांचे स्मारक देखील पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे, आकर्षक आणि भव्य असावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()