...तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा

uddhav Thackeray
uddhav Thackeray
Updated on
Summary

देशात सर्वत्र 75 वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं.

मुंबई- देशात सर्वत्र 75 वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी कोरोना स्थितीवर भाष्य केलं. पुढचा स्वातंत्र्यदिवस कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणार अशी प्रतिज्ञा घेण्याचं त्यांनी आवाहन केलं. महाराष्ट्रात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण, परिस्थिती बिघडली तर पुन्हा राज्यात लॉकडाऊन कराला लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिली आहे. ( Maharashtra Latest News)

16 ऑगस्टपासून राज्यात अनेक निर्बंधातून शिथिलता देण्यात आली आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. काही निर्बंध शिथिल केले आहेत. पण, संकट टळले आहे असं आपण म्हणू शकत नाही. जगात काही ठिकाणी पुन्हा कोरोनाने उचल खाल्ली आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोकांनी धोका लक्षात घ्यावा, असं ठाकरे म्हणाले.

uddhav Thackeray
75 व्या स्वातंत्र्यानिमित्त 75 'वंदे भारत' रेल्वेची घोषणा

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. आपण त्याच्याशी लढा देत आहोत. आरोग्य सुविधा वाढवत आहोत. पण, ऑक्सिजनची कमतरता चिंता वाढवू शकते. ऑक्सिजनचा पुरवठा लक्षात घेऊन आपण निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या मागणी वाढली आणि आपल्याकडे तेवढा पुरवठा नसेल तर कदाचित पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्याला लागू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं. विधानभवनात परिषदेचे सभापती रामराज नाईक निंबाळकर यांनी तर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशांनी ध्वजारोहण केलंय. मुख्यमंत्री मंत्रालयात ध्वजारोहण करून त्यानंतर विधानभवन आणि उच्च न्यायालयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कोविडमध्ये सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टर्सशी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण झाल्यावर संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.