मुख्यमंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार? CMO ने दिली माहिती

CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackerayTeam eSakal
Updated on

मुंबई : राज्य विधीमंडळाच अधिवेशन २२ डिसेंबरपासून (Maharashtra Assembly Winter Session 2021) सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजारी होते. त्यामुळे या चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray
राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून,पाहा Video !

हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात यावे, अशी मागणी होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होती. आजारपणानंतर झालेल्या बैठकांना मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन हजेरी लावली होती. त्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशनासाठी नागपूरला येण्याची शक्यता कमी होती. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्यात येत आहे. त्यानिमित्त आज सायंकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत देखील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? -

यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता. या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री नवाब मलिक यांनी देखील वारंवार देवेंद्र फडणवीस आणि एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. याबाबत मी अधिवेशनात बोलेन, असं नवाब मलिक म्हणाले होते. त्यानंतर आता ते अधिवेशनात कुठले मुद्दे उपस्थित करतात आणि कोणावर निशाणा साधतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात परीक्षांबाबतचा घोटाळा समोर आला आहे. आरोग्यविभाग, म्हाडा आणि टीईटी या तिन्ही परीक्षा सरकारला वेळेवर रद्द कराव्या लागल्या. या तिन्ही परीक्षांचे पेपर लिक झाले होते. त्यामुळे या मुद्द्यावरून देखील विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()