नागपूर : राज्यात सध्या लॉकडाउन (Maharashtra Lockdown) सुरु आहे. मात्र १ जूनपासून काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ सुरु असणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या दुकानांबरोबरच इतर दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र आज मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी पत्रकार परिषद घेत. राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याची घोषणा केली. मात्र असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO Maharashtra) सांगण्यात आलं. यावर आता वडेट्टीवारांनी यू टर्न घेतला आहे. (CM will take final decision about unlock said Wadettiwar)
राज्यातील अनलॉक हा ५ टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. तर जिल्हे तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहेत. यातील पहिल्या टप्प्यांमध्ये असणाऱ्या १८ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असल्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये संपूर्ण अनलॉक केलं जाईल कुठल्याही प्रकारचं लॉकडाऊन नसेल अशी घोषणा आज संध्याकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. मात्र आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं स्पष्ट केलंय.
पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांमध्ये कुठलीही गफलत नाही. याआधी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यास तत्वतः मान्यता दिली होती. जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या बघूनच हा निर्णय घेण्यात आला होता असं वडेट्टीवारांनी म्हंटलंय.
अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा
पत्रकार परिषदेत वडेट्टीवारांनी संपूर्ण अनलॉक करण्याबाबत निर्णय जाहीर केला. मात्र आता मुंबईहून नागपूरला येताच महाराष्ट्र अजून अनलॉक झालेला नाही. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी घोषणा केली आहे.
तत्वतः म्हणायचं राहिलंच
पत्रकार परिषदेत तत्वतः म्हणायचं राहिलं असं स्पष्टीकरण वडेट्टीवारांनी दिलंय. राज्यभरात ग्रामीण आणि महानगर असे मिळून ४३ युनिट तयार केले आहेत. त्यातील १८ युनिट अनलॉक करण्याचा विचार सुरु आहे. त्यानुसार यास एचडीएमनं मान्यता दिली आहे हे मात्र लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. शिथिलता आणणं हे नक्की आहे मात्र टप्प्याटप्याने हे शिथिलता देण्यात येईल. आज मान्यता मिळाली आहे उद्या मुख्यमंत्री चर्चा करतील असंही वडेट्टीवार म्हणाले.
समन्वयाचा अभाव
आजच्या घटनेनंतर एकूणच ठाकरे सरकारमध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याचं चित्र दिसून येतंय. कुठलाही निर्णय जाहीर करण्याच्या आधी मुख्यमंत्री कार्यलयाबरोबर समन्वय साधूनच निर्णय घेणं महत्वाचं असतं. मात्र आजच्या गोंधळानंतर खरंच ठाकरे सरकारमध्ये समन्वय आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(CM will take final decision about unlock said Wadettiwar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.