पुणे: राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. काही शहरांतील किमान तापमान पहिल्यांदाच 10 अंशांखाली घसरले आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट काही दिवसांत महाराष्ट्रातही येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.