मुंबई - विकासाचा दृष्टिकोन अन् विकसित महाराष्ट्र ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेसमोर घेऊन जायचे आहे. ही निवडणूक आपल्या लोककल्याणकारी योजनांवरच आपण लढणार आहोत.
अर्थसंकल्पात महिला, युवा, शेतकरी, वारकरी, दुर्बल, आदिवासी, मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजासाठी घोषित केलेल्या क्रांतिकारी योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत दिले.
पक्षाच्या आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील विशेष निमंत्रितांची बैठक बोलावण्यात आली होती.
मनुस्मृती कदापि मान्य नाही..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमचं लोकशाहीवादी आणि समतेची भूमिका जपणारा पक्ष आहे, असे सांगून अजित पवार यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार असेल तर तो आपल्या पक्षाला कदापि मान्य नाही. आपण कायमचं मनुस्मृतीच्या विरोधात राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.