"जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल, वानखेडेंची चौकशी होणारच"

समीर वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोटे पुरावे दिल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
Nawab malik-samir wankhede
Nawab malik-samir wankhedegoogle
Updated on

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि एनसीबीच्या (NCB) कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ड्रग्स संपलं पाहिजे यासाठी मी काम केलं होतं. सुशांत सिंग प्रकरणानंतर बॉलीवूडमधील लोकांवर आरोप झाले होते, त्यावर मी भाष्य केलं होतं, तेव्हा पत्रकारांनी आपल्याला सांगितलं होतं की, समीर वानखेडे तुमच्यावर नाराज आहेत. त्यानंतर माझ्या जावयाला NCB ने समन्स पाठवले होते असे म्हणत नवाब मलिक यांनी आज साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलाशे केले आहेत.

Nawab malik-samir wankhede
ST STRIKE: सरकारने निवडला खासगी वाहतुकीचा पर्याय

जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली...

समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलताना नवाब मलिक यांनी पुन्हा मुंबईत काही एजंट यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला. काही लोक माझं बोलणं बंद व्हावं यासाठी प्रयत्न करताय, पण बोलणं हा माझा मुलभूत हक्क असल्याचा देखील त्यांनी सांगितलं. तसेच वानखेडे यांच्या जातीबद्दल त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली असून त्यांची चौकशी होईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

Nawab malik-samir wankhede
ST Strike : हायकोर्टाच्या आदेशाचा आदर करा, अन्यथा...; परबांचा इशारा

भाजपशी आमचा राजकीय लढा आहेच मात्र...

पुढे बोलताना नवाब मलिक यांनी असंही सांगितलं की, आमचा राजकीय लढा भाजपशी आहेच, मात्र हा लढा मी समीर वानखेडेच्या विरोधात लढत आहोत. चांडाळ चौकडीच्या विरोधातील हा लढा आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात आपल्या सोबत महाविकास आघाडीतील सर्व लोक असून, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही यावरून वक्तव्य केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण कधीही यांच्या विरोधात लढा देण्यासाठी कमजोर पडलो नाही, मात्र जेव्हा आपण कमजोर पडू तेव्हा इतर लोक आपल्याला साथ देखील असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.

जर ते प्रमाणिक असतील, तर त्यांनी...

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आजवर अनेक आरोप केले आहेत. मात्र आपण आरोप करूनही समीर वानखेडे कधीच आपली चौकसी करा असे म्हणत नाही, जर ते प्रामाणिक अधिकारी असते, तर त्यांनी सांगितलं असतं की माझी चौकशी करा, पण ते तसं म्हणत नाहीत, म्हणजेच त्यांच्या मनात काहीतरी भीती आहे, असंही पुढे नवाब मलिक यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.