मुंबई : प्रचंड गदारोळात विद्यापीठ कायदा (Universities law) मंजूर करुन घेत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची (Winter Session) अखेर आज सांगता झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर २०२१ सात दिवसांसाठी घेण्यात आलं. दरम्यान, दोन्ही सभागृहांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, विधानसभा अध्यक्षांची निवड यावेळी होऊ शकली नाही. दरम्यान, पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर येथे पार पडणार आहे. (Conclusion of winter session of maharashtra assembly in controversy over University Act)
यावेळी विधानसभेत एकूण १९ विधेयकं तर विधानपरिषदेत ४ विधेयकं मंजूर झाली. यांपैकी महिला आणि बालकांवरील अत्याचारांसंदर्भात कठोर कारवाईची तरतूद असणारा ‘शक्ती फौजदारी कायदा सुधारणा विधेयक’ आणि विद्यापीठ कायदा ही महत्वाची विधेयकं होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळुरु येथील पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी विधानसभेत सरकारच्यावतीनं निषेध व्यक्त करण्यात आला, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव मांडण्यात आला, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याला विधानपरिषदेत मंजूरी देण्यात आली.
यंदाचं अधिवेशन अनेक कारणांनी गाजलं!
यंदाचं हिवाळी अधिवेशन हे इतर विविध कारणांनी गाजलं. यामध्ये मुख्यमंत्र्यांची गैरहजरी आणि विरोधकांचा गोंधळ, भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल आणि माफी, नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची खिल्ली, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल-सरकार पेच, आरोग्य विभाग-म्हाडा-टीईटी पेपरफुटी प्रकरण आणि घोटाळे आदी मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळाले.
विधीमंडळातील एकूण कामकाज
या अधिवेशनात सभागृहात एकूण पाच बैठका पार पडल्या. तसेच प्रत्यक्ष झालेलं कामकाज ४६ तास ५० मिनिटं. अन्य कारणांसाठी वाया गेलेला वेळ एकूण ५० मिनिटं. रोजचं सरासरी कामकाज ९ तास. तारांकित एकूण प्राप्त प्रश्न - ५१४४, स्विकृत प्रश्न - २९९, सभागृहात उत्तरं देण्यात आलेले प्रश्न - ३२, एकूण लक्षवेधी सूचना - १,०६५, स्विकृत सूचना - ५७, चर्चा झालेल्या सूचना - २१, नियम ९७च्या प्राप्त सूचना - १७, एकूण संमत करण्यात आलेली विधेयकं - १९, विधानपरिषदेत ४ विधेयकं संमत, सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८९.४० टक्के, कमीत कमी उपस्थिती ७७.११ टक्के.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.