Mahayuti: काँग्रेसमधून महायुतीत आलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात भाजप-सेना भुईसपाट, वाचा आकडे काय सांगतात

Ashok Chavan: अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि मुंबईचे आक्रमक नेते संजय निरूपम यांनी अत्यत अडचणीच्या काळात काँग्रेसचा हात सोडत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला होता.
Ashok Chavan Milind Deora Sanjay Nirupam
Ashok Chavan Milind Deora Sanjay NirupamEsakal
Updated on

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला जबरदस्त यश मिळाले. पण निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि मुंबईचे आक्रमक नेते संजय निरूपम यांनी अत्यत अडचणीच्या काळात काँग्रेसचा हात सोडत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला होता.

निवडणुक तोंडावर असताना या दिग्गजांना साथ सोडल्यामुळे एकतरी जागा निवडून आणता येईल का नाही अशा प्रश्न राजकीय पंडीत उपस्थित करत होते. मात्र, काँग्रेसने या निवडणुकीत जबरस्त यश मिळवत 13 जागांवर विजय मिळवला तर, दुसरीकडे ज्या नेत्यांनी महायुतीत जाणे पसंत केले त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने विजय मिळवला.

अशोक चव्हाण

यंदाची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एक महिना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेताल. ज्या दिवशी चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला, त्याचदिवशी भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. पुढे सर्वच पक्षानी ही निवडणूक बिनविरोध केली अन् चव्हाण थेट राज्यसभेत पोहचले.

या निवडणुकीत भाजपने अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना संधी दिली होती. यावेळी अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची ताकद एकत्र आल्याने त्यांचा विजय निश्चित होता.

पण, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याचा जनतेचा रोष आणि मराठवाड्यातील मराठा आंदोलनामुळे काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी 59442 मतांनी पराभूत केले.

चव्हाण यांनी 5,28,894  मते मिळवली होती. तर चिखलीकरांना 4,69,452 मते मिळाली.

Ashok Chavan Milind Deora Sanjay Nirupam
Bajrang Sonawane: बजरंगाची कोलांटी उडी? "बीडच्या बाप्पाचा अजित पवारांना फोन," त्या ट्वीटमुळे खळबळ

मिलिंद देवरा

राज्यात काँग्रेस, राष्ट्रावादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मलिंद देवरा यांची अडचण झाली होती. कारण दक्षिण मुंबई मतदासंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत विद्यमान खासदार होते. त्यामुळे देवरा यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणे कठीण होते.

या गुंत्यामुळे देवरा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत, आपल्या पदरात राज्यसभा पाडून घेतली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी देवरांवर होती. पण देवरा हे आव्हान पेलू शकले नाहीत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत होते. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव उभ्या होत्या.

यामध्ये विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी बाजी मारत 52683 मतांनी विजय मिळवला. त्यांना 3,95,655 मते मिळाली. तर जाधव यांना 3,42,982 मते मिळाली.

Ashok Chavan Milind Deora Sanjay Nirupam
RSS on BJP : ''संघाची भाजपला गरज...'' आरएसएसच्या टिपण्णीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना सल्ला

संजय निरूपम

अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना काँग्रेस सोडताच राज्यसभा मिळाली. पण यामध्ये संयज निरूपम दुर्दैवी ठरले. त्यांना राज्यसभा तर मिळालीच नाही पण लोकसभेची उमेदवारीही मिळाली नाही.

मुंबई उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासरदा गजानन किर्तीकर यांच्या पुत्र अमोल किर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिंदेंच्या शिवसेनेने आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली होती.

देशातील सर्वात चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार वायकर यांनी किर्तीकरांवर अवघ्या 48 मतांनी निसटता विजय मिळवला.

वायकर यांना 452644 मते मिळाली तर किर्तीकरांना 452596 मते मिळाली.

एककडी राज्यसभा मिळूनही चव्हाण, देवरा आपल्या उमेदवारांना निवडून आणू शकले नाहीत. मात्र दुकरीकडे कोणतेही पद न मिळता निरूपमांनी आपल्या मतदारसंघातील उमेदवारा कसाबसा विजय मिळवून देऊ शकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.