Maharashtra Politics : संजय शिरसाटच ठाकरेंच्या शिवसेनेत जातील; 'या' नेत्याचा गोप्यस्फोट

congress ashok chavan on mla sanjay shirsat about rejoining uddhav thackeray faction maharashtra politics news
congress ashok chavan on mla sanjay shirsat about rejoining uddhav thackeray faction maharashtra politics news
Updated on

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेते संजय शिरसाट यांनी लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय चर्चा सुरू असतानाच अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिरसाटांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, संजय शिरसाट भविष्यकार आहेत का? शिरसाट यांचं वक्तव्य गांभीर्याने घ्यायची गरज नाही असे चव्हाण यांनी म्हटले आहे. खरं तर त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळत नसल्याने, मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने शिरसाट हे लवकरच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत जातील असे भाकीत देखील अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

congress ashok chavan on mla sanjay shirsat about rejoining uddhav thackeray faction maharashtra politics news
Dream 11 Team : अवघ्या ४९ रुपयांत टीम बनवली,जिंकले दीड कोटी! ट्रक ड्रायव्हरचं 'ड्रीम' झालं पूर्ण

शिरसाट काय म्हणाले होते?

काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. मला तरी असं वाटतं आहे की अनेक दिवसांपासुन ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे असं संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

congress ashok chavan on mla sanjay shirsat about rejoining uddhav thackeray faction maharashtra politics news
IPL 2023 : मुंबईला लोळवणाऱ्या RCB ला मोठा झटका; खुंखार गोलंदाज अचानक संघाबाहेर

एवढा मोठा नेता असून त्यांना काँग्रेसमध्ये बरोबर वागणूक मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील. तसेच प्रयत्न चालू आहेत. अनेक घडामोडी तशा सुरू आहेत. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()