Vidhansabha Election : फक्त मुख्यमंत्रीपद नव्हे १०० जागाही... विधानसभेसाठी काँग्रेस का करतेय इतक्या मागण्या?

Maharashtra election news : राज्यात आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
Vidhansabha Election
Vidhansabha Election
Updated on

राज्यात आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. येत्या काही दिवसात राज्यात निवडणुकीची अचारसंहिता लागू शकते. यादरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. मात्र असे बोलले जात आहे की, काँग्रेसची नजर ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आहे. मात्र पक्षाने अद्याप अधिकृतरित्या यावर काहीही भाष्य केलेले नाही. यासोबतच काँग्रेस विधानसभा निवडणुकीत १०० जागांसाठी देखील आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये पक्षाची उपमुख्यमंत्री पदाची मागणी देखील माविआमधील सहकाऱ्यांनी मान्य केली नव्हती.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, काही सूत्रांनी माहिती दिली आहे की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात जास्त जागा आणि मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ने १७ जागांवर निवडणूक लढवली आणि ९ जागांवर विजय मिळवला होता. तर १० जागांवर लढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला होता. याशिवाय सांगली येथे निवडून आलेले अपक्ष विशाल पाटील यांनी देखील काँग्रेसला समर्थन दिले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास होता की या लोकसभा निवडणुकीत निकाल त्यांच्या बाजूने राहिला तर विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात त्यांच्या पक्षाची बाजू भक्कम असेल. रिपोर्टनुसार, पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा जनाधार आहे. प्रादेशिक नेत्यांना भविष्याचा अंदाज घेता आला तर ते रिझल्ट देऊ शकतात.

Vidhansabha Election
Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

काँग्रेसला किती जागा हव्यात?

रिपोर्टमध्ये महाविकास आघाडीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, काँग्रेस २८८ पैकी ११०-११५ जागांवर तयारी करत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ९० ते ९५ जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८० ते ८५ जागा सोडण्याचा विचार काँग्रेस करत आहे. मात्र आतापर्यंत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाचे नेते १०० पेक्षा कमी जागांवर लढण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेसकडून आघाडीच्या नेत्यांना सांगितले जात आहे की निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाही. यातच दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असे म्हटले होते. ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे सीट शेयरिंगच्या चर्चेसाठी दिल्लीला पोहचले होते. सांगितले जात आहे की ते १०० च्या जवळपास जागांची मागणी केली होती. पण काँग्रेसचा प्रयत्न पाहाता उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत झटका बसण्यचाी शक्यता आहे.

Vidhansabha Election
शासनाच्या भरवशावर राहू नका, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेवर...गडकरींनी स्पष्ट सांगितलं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.