Mahavikas Aghadi: मविआमध्ये फूट? वज्रमुठ सभेनंतर राहुल गांधी नागपूरमध्ये घेणार जाहीर सभा; काँग्रेस नेत्याची माहिती

Mahavikas Aghadi: काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे.
congress leader ashish deshmukh criticizes nana patole
congress leader ashish deshmukh criticizes nana patole esakal
Updated on

Mahavikas Aghadi: काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप करत आहेत.

पटोले लवकरच गुवाहाटीला असतील त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो, या त्यांच्या विधानामुळं खळबळ उडाली होती. (Latest Marathi News)

congress leader ashish deshmukh criticizes nana patole
Maharashtra Politics: BMCसह राज्यातील महापालिका निवडणुका कधी? चंद्रकांत पाटलांचं महत्त्वपूर्ण भाकित

त्यानंतर आता दुसरा आरोप केला आहे. येत्या १६ तारखेला महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपूरमध्ये पार पडणार आहे. त्यापाठोपाठ राहुल गांधी देखील २० ते २५ तारखेला नागपूरमध्येच जाहीर सभा घेणार आहे.

यावर बोलताना आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करत म्हणाले महाविकास आघाडीमध्ये फूट पडावी यासाठी खोके कारणीभूत आहेत का, असा मला प्रश्न पडत आहे.

congress leader ashish deshmukh criticizes nana patole
Maharashtra Politics : सुषमा अंधारे व राखी सावंत दोघी बहिणी; एकमेकींच्या स्पर्धक - मोहित कंबोज

काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहेत, असंही देशमुख म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वेगळी चूल मांडावी असे प्रयत्न नाना पटोले यांच्या माध्यमातून केले जात आहेत.

तसेच मविआची वज्रमुठ सभा होत असताना, लगेच काँग्रेसची दुसरी सभा घेण्याचं अवचित्त काय आहे, त्याच्या मागे काय कारण आहे . असं म्हणत त्यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.