फडणवीसींचे भाषण ऐकले नाही; बाळासाहेब थोरातांचा सावध पवित्रा

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat sakal
Updated on

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मआविच्या मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब (Balasaheb Thorat )थोरात यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले आहे की, आपण फडणवीसांचे भाषण ऐकलेले नाही. त्यामुळे संपूर्ण भाषण ऐकल्याशिवाय आणि अभ्यास केल्याशिवाय यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे म्हणत यावर न बोलण्याचा सावध पवित्रा घेतला आहे. (Mahavikas Aghadi Leaders Reaction After Fadnavis Allegations)

Balasaheb Thorat
तालिबानच्या राजवटीत 400 नागरिक मारले गेले, UN च्या अहवालात खुलासा

विरोधी पक्षाचं कामचं आरोप करणे - अशोक चव्हाण

दरम्यान, फडणवीसांच्या आरोपांनंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे की, आज आपण यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र, विरोधी पक्षाचं कामच आरोप करणं आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर गृहमंत्र्यांचे उत्तर आल्यानंतरच याबाबतची सर्व वस्तूस्थिती स्पष्ट होईल असे अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. या सर्व आरोपांवरील सरकारची भूमिका गृहमंत्र्यांच्या रिपोर्टनंतर स्पष्ट होईल. मात्र, तोपर्यंत यावर बोलणं उचित नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. फडणवीसांनी केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे का? असे विचारले असता मविआला कोणत्याही प्रकारचा धक्का बसलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Balasaheb Thorat
आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आजपासून सुरुवात... मार्गदर्शक तत्व जारी

फडणवीसांच्या आरोपांची पडताळणी करू - एकनाथ शिंदे

दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करू अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. तसेच ऑडिओ, व्हिडिओची पडताळणी गृहविभाग करेल असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर यावर योग्य ती कारवाई गृहविभाग करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी ही कारस्थानं केल्याचा आरोप करत महाजन यांच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांना मोकामध्ये कसं अडकवायचं याचे ड्राफ्ट सरकारी वकिलांनी करुन दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसंच दाऊद इब्राहीमशी संबंधीत लोकांवर केलेल्या कारवाईवरुन देखील फडणवीसांनी काही आरोप केलेत. या सर्व आरोपांनंतर मविआ सरकारमधील नेत्यांनी यावर वरील प्रतिक्रिया दिल्या असून, या सर्वामध्ये बोलताना सर्वच नेत्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.