नाना पटोलेंच्या तोंडी गोडसेची भाषा? गांधी हत्येबाबात वादग्रस्त वक्तव्य

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीबद्दल बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली आहे.
Nana Patole
Nana Patolenana patole
Updated on

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीबद्दल (Mahatma Gandhi Death Anniversary) एका कार्यक्रमात बोलत असताना, नाना पटोलेंची जीभ घसरल्याचं समोर आलं आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यानं नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस (Congress) प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे मुंबईमध्ये बोलत असताना त्यांनी देशातील पहिला दहशतवादी नाथुराम गोडसेनं आजच्याच दिवशी गांधीजींचा वध केला असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. त्यांनी वध हा शब्द वापरल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या तोंडातही गोडसेंची भाषा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. (Controversial Statement of Nana Patole on Mahatma Gandhi ji)

Nana Patole
कोल्हे नथुरामच्या भूमिकेचं मानधन परत करणार का? भाजप आमदाराचा सवाल

नाना पटोले यांच्या वक्तव्यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही टीका केली आहे. नटवरलाल नाना पटोलेंवर मानसिक उपचार होणं गरजेचं आहे, त्यांना औषधी पाठवल्या आहेत. त्यांनी उपचार सुरु करावेत. यापुर्वी वध आणि हत्या यावरून राज्यात वाद झाले असताना ते जाणीवपुर्वक वक्तव्य करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

Nana Patole
पुणेरी विवेकाचे ठेकेदार अमृता फडणवीसांच्या भाषेवर....; हरी नरकेंचा सवाल

काँग्रेसकडून नेहमीच गोडसेंवर टीका करण्यात येते मात्र आज गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी काँग्रेस नेत्याकडून असा उल्लेख झाल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही आपलं मत मांडलं आहे. गांधींचा वध झाला असं म्हणणं हे अवमानकारक आहे. वध हा शब्द संघ परिवाराने जाणीपुर्वक रूजवला होता. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाही हे कळू नये का? काँग्रेसचे लोक गांधींना कधीच विसरले असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.