Nana Patole: नाना पटोले नाराज? आजारपणाचं कारण देऊन वज्रमूठ सभेला दांडी; परंतु आज...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेची कालच्या संभाजीनगरमधील सभेला दांडी
Nana Patole
Nana PatoleEsakal
Updated on

संभाजीनगरमध्ये काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये ही सभा झाली होती. या सभेला अलोट गर्दी जमली होती. या सभेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार भाषणे झाली. पण ही सभा चर्चेत आली ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गैरहजेरी असल्यामुळे. त्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या.

दरम्यान प्रकृती बरी नसल्याचं कारण देत पटोले संभाजीनगरला गेले नाहीत. मात्र, आज पटोले सुरतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटायला जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजीनगरच्या सभेला जाण्यासाठी त्यांची प्रकृती बरी नव्हती. सुरतला जाताना तब्येत कशी बरी झाली? 12 तासात पटोले अचानक ठणठणीत कसे बरे झाले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर नाना पटोले महाविकास आघाडीवर नाराज असल्याचंही बोललं जात असल्यामुळे आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची चर्चा रंगली आहे.

Nana Patole
Sambhaji nagar : राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतंय छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरच्या या सभेची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी आणि चर्चा सुरू होती. सभेचे टिझर्स लॉन्च करण्यात आले होते. संभाजीनगरच्या चौकाचौकात पोस्टर्स, होर्डिंग्ज आणि झेंडे लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोटो होते. मात्र या बॅनरवरती आणि टिझर्समध्ये राहुल गांधी नसल्यामुळे त्यांना वगळल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

Nana Patole
Rahul Gandhi: मानहानी प्रकरणी निकालाला आठवडा उलटल्यावर काँग्रेसच्या हालचाली सुरू

त्याचबरोबर नाना पटोले यांनी ऐनवेळी सभेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपली प्रकृती बरी नसल्याचं कारण दिलं होतं. पटोले हे खरोखरच तब्येत ठिक नसल्याने सभेला गैरहजर राहिले होते. मात्र, पटोले यांच्या सूरत दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी हे सूरतला जाणार आहेत. त्यामुळे नाना पटोलेही राहुल गांधी यांना भेटण्यासाठी सूरतला जाणार आहेत. नाना पटोले हे सूरतला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नाना पटोले काल सभेवेळी आजारी होते. त्यामुळे संभाजीनगरला आले नाही. आज ते सूरतला कसे जात आहेत? 12 तासात त्यांचा आजार बरा झाला का? सभा टाळण्यासाठीच त्यांनी आजारपणाचं कारण दिलं होतं का? की यामागे पटोले यांची काही नाराजी आहे का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

Nana Patole
Eknath Shinde Ayodhya Visit : सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी CM शिंदेंसह ४० आमदारांचे रामाला साकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.