"लसींशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे..."; खान यांची मोदींवर टीका

"लसींशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे..."; खान यांची मोदींवर टीका देशातील काही राज्यांमध्ये लसतुटवडा असल्याचे सांगितलं जातंय Congress Leader Naseem Khan Slams Pm Modi BJP Govt shortage of Covid 19 Vaccination Central Vista Project vjb 91
PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi
Updated on

देशातील काही राज्यांमध्ये लसतुटवडा असल्याचे सांगितलं जातंय

मुंबई: देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. लसींशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध लढण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. एकीकडे सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2022 पर्यंतची कालमर्यादा घालून दिली आहे. पण त्याचवेळी देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा ठरवलेली नाही, असे उत्तर संसदेत सरकार देत ही बाब दुख:द आहे, असेही खान म्हणाले. (Congress Leader Naseem Khan Slams Pm Modi BJP Govt shortage of Covid 19 Vaccination Central Vista Project)

PM-Narendra-Modi
लहानग्यांच्या लसीकरणाबाबत भारती पवार यांची महत्त्वाची माहिती

"गेल्या दीड वर्षांच्या कोरोनाकाळात केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरले आहे. कोरोनाची औषधे असोत, ऑक्सिजन असो आणि आता लसीकरण, या सर्वांच्या तुटवड्याची जबाबदारी केंद्राची आहे. आता जाणकार मंडळी तिसऱ्या लाटेची भीती वर्तवीत असताना लस हाच लोकांना वाचविण्याचा खात्रीशीर उपाय आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लशी मिळत असताना सरकारी केंद्रांवर मात्र लशींचा तुटवडा आहे. सर्व नागरिकांचे त्वरेने लसीकरण ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे ती जबाबदारी केंद्राला पूर्ण करता येत नाही", असेही खान यांनी नमूद केले.

Naseem-Khan-Congress
Naseem-Khan-Congress
PM-Narendra-Modi
कायलीच्या तोंडी आले 'ते' शब्द; आई म्हणाली 'तुला मी नंतर बघते'

केंद्राने ठराविक कालमर्यादेत कोणत्याही राज्याला पुरेसा लसपुरवठा केला नाही. लस उत्पादकांनी लशी या थेट केंद्राला द्याव्यात, राज्यांना वा महापालिकांना देऊ नयेत या केंद्राच्या निर्बंधांमुळे राज्य-महापालिका यांचीही अडचण झाली आहे. त्याचमुळे महापालिकांच्या ग्लोबल टेंडरना देखील कोणी विचारीत नाही. अजूनही देशातील 90 टक्के लोकांचे लसीकरण शिल्लक असून त्याला किती वर्षे लागतील हे केंद्राने जाहीर करावे. लशीशिवाय कोरोनाशी लढा देणे म्हणजे विनापात्याच्या तलवारीने हवेत खोटेखोटे वार करत युद्ध लढण्यासारखे आहे, हे पंतप्रधानांनी ध्यानात ठेवावे, असाही टोमणा खान यांनी मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.