Parliament Session: हिंदूंच्या भावना माहीत नाहीत का ? पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारला थेट सवाल

Prithviraj Chavan vs Narendra Modi
Prithviraj Chavan vs Narendra Modiesakal
Updated on

Congress leader Prithviraj Chavan on the special session

मुंबई- संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. हिंदू सणांच्या कालावधीमध्येच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय, त्यामुळे मोदी सरकारला हिंदूंच्या भावना माहीत नाहीत का? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

एक गोष्ट स्पष्ट झालीये की मोदी सरकार अस्वस्थ झालं आहे. लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच अशा गोष्टी केल्या जातात. गणेश चतुर्थी उत्सव जवळ आला असताना अशा प्रकारचे विशेष अधिवेशन बोलावण्याची काय आवश्यकता होती? त्यांना हिंदूंच्या भावना माहीत नाहीत का ? असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींना केला आहे.

Prithviraj Chavan vs Narendra Modi
One Nation-One Election: 'एक देश, एक निवडणूक' म्हणजे नेमकं काय? फायदे आणि तोटे जाणून घ्या

संसदेच्या विशेष अधिवेशनाता एक देश, एक निवडणूक याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकत्र निवडणुका घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे मोदी सरकार एकत्र निवडणुकांबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय. यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चव्हाण म्हणाले की, 'निवडणुका कधीही घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यांना लोकसभेच्या निवडणुका लवकर घ्यायच्या असतील, तर ते निवडणुका घेऊ शकतात. त्यांना काही नवी विधेयके मंजूर करायची असतील तर त्यांनी याबाबत आम्हाला सांगावं.'

Prithviraj Chavan vs Narendra Modi
One Nation One Election: 'एक देश एक निवडणूक' होणारच? माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

एक देश एक निवडणूक यावरुन देशात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांची मुंबईत बैठक सुरु असताना हा विषय चर्चेला आल्याने त्याचे परिणाम बैठकीवर होणार आहेत. विरोधकांनी मोदी सरकारच्या या अजेंड्याला विरोध केलाय, तर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला पाठिंबा दर्शवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.