Sharad Pawar: "भाजपकडून शरद पवारांना 'या' दोन मोठ्या पदांच्या ऑफर" पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर शरद पवारही भाजपसोबत जातील असं अनेकांना वाटलं होतं. पण शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. अजित पवारांच्या भुमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

त्यामुळे आता भाजपने पुन्हा शरद पवारांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तर अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर पुन्हा शरद पवार अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा रंगली. मात्र पुन्हा एकदा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या माध्यमातून या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या शरद पवार यांच्यासोबत ज्या भेटीगाठी वाढल्या आहेत, त्यामागे या ऑफर्सवरील चर्चा असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar: मलिक कोणत्या गटात? कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वतः शरद पवार करणार चर्चा

तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला आहे. यासंबधीचे वृत्त 'फ्रि प्रेस जर्नल' या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील उद्योगपती अतुल चौरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतमध्ये शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते, असं सांगण्यात आलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : 'शिवसेनेच्या डीएनएमध्ये असं ढोंग नाही, भीष्म पितामह यांच्याकडून तरी...'; ठाकरे गटाचा शरद पवारांवर निशाणा

सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनाही ऑफर

जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. अजित पवार हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजित पवारांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितलं असल्याचं समजतं.

भाजपने आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडली. भाजपला आता शरद पवार यांनाही आपल्यासोबत घ्यायचं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळावं म्हणून भाजपची ही खेळी असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.