'पाकिस्तानात म्हणण्यात हरकत काय?'; हनुमान चालिसावरून कॉंग्रेसचा मोदींवर निशाणा

PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal
Updated on

राज्यात मागील काही दिवसांपासून हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंगे यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या दरम्यान भाजपकडून हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायचा का असे विधान भाजपकडून करण्यात आले होते याला कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर देत भाजप पक्षासोबतच पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी "हनुमान चालीसा पाकिस्तानात जाऊन म्हणण्यात हरकत काय आहे?" असा प्रतिसवाल देखील भाजपला केला आहे.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यावरून अटक झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी "हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानमध्ये म्हणायची का? हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार केला म्हणून अटक? हनुमान चालीसा म्हणणं हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू, आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्यासाठी तयार आहे." असे वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याच्या ट्विटवर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

PM Narendra Modi
'लाथ मारायची अन् सॉरी म्हणायचं ..'; चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका

सचिन सावंत यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तना भेटीची आठवण करून दिली आहे, त्यानी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाच्या केक पेक्षा हनुमान चालिसा म्हणणं चांगल असा खोचक टोला भाजपला लगावला आहे " अखंड भारताचे स्वप्न दाखवता मग हनुमान चालीसा पाकिस्तानात जाऊन म्हणण्यात हरकत काय आहे?" असा सवाल केला आहे. त्यांनी पुढे "नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या केक पेक्षा हनुमान चालीसा म्हणणे चांगले. पाकिस्तानात तसेही हनुमान मंदिर आहेतच. तीथेही पाठ होत असेलच की!" असा खोचक टोला देखील लगावला आहे.

PM Narendra Modi
"किरीट सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू इच्छित आहेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.