Shivani Wadettiwar: "बलात्कार राजकीय हत्यार...", लेकीच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

बलात्काराला राजकीय हत्यार म्हणणारे सावरकर प्रेरणास्थान कसे?" शिवानी वडेट्टीवारांचे विधान
Shivani Wadettiwar
Shivani WadettiwarEsakal
Updated on

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी देखील सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा काँग्रेसला दिला. यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवरा यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला त्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिवानी वडेट्टीवार वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी आज या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुलीच्या व्यक्तव्याच त्यांनी समर्थन केलं आहे. शिवानी यांनी सावरकरांचं एक पुस्तक वाचून हे वक्तव्य केलं आहे. यावर तीच खुलासा करेल. भाजपने आरोप करण्यापूर्वी आधी संपूर्ण सावरकर वाचावा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे.

Shivani Wadettiwar
Shivani Wadettiwar : "बलात्काराला राजकीय हत्यार म्हणणारे सावरकर प्रेरणास्थान कसे?" शिवानी वडेट्टीवारांचे विधान

काय म्हणाल्या होत्या शिवानी वडेट्टीवार ?

बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं, असा दावा शिवानी यांनी केला आहे. हे लोक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर सावरकरांवर मोर्चा काढतात. सावरकरांचे विचार होते, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना कसं सुरक्षित वाटेल, असा प्रश्न शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे.

Shivani Wadettiwar
Old Mumbai Pune Highway Acident: बोरघाटाच्या अपघातातील जखमींची नावे जाहीर, झांज पथकातील वादकांचा होता समावेश

शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्याच माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केलं आहे. ते म्हणाले, ‘ मी शिवानीला विचारलं. ती म्हणाली, सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक ‘सहा सोनेरी पानं..’ याचा संदर्भ घेऊन ती बोलली. तसं असेल तर त्यात वाद होण्याचा विषय नाही. मत-मतांतरं असू शकतात. मला तो संदर्भ माहिती नाही. ती वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचा छंद आहे असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Shivani Wadettiwar
Pulwama Attack: 'पुलवामा हल्ल्यावेळी RDX पोहचलं कसं?' राऊतांनी प्रश्न उपस्थित करत केले गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.