Bhai Jagtap : संभाजी भिडेंना 'माथेफिरू' हा शब्दही सौम्य झालाय; काँग्रेस आमदाराची सडकून टीका

भाजपनंच त्यांना गुरुजी नवलं आहे - आमदार जगताप
Bhai Jagtap vs Sambhaji Bhide
Bhai Jagtap vs Sambhaji Bhideesakal
Updated on
Summary

भाजपनंच त्यांना गुरुजी बनवलं आहे. त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, अशीही त्यांनी टीका केली.

कराड : ज्या माणसाला स्वतःचं नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत होवू शकतो? भाजपनंच त्यांना गुरुजी (Sambhaji Bhide) बनवलं आहे. त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, अशी बोचरी टीका आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी 'भिडे गुरुजी' या नावावरून भाजपवर केली.

सातारा लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी काँग्रेसच्या सातारा जिल्हा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार जगताप हे कराड (जि. सातारा) दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी शनिवारी सकाळी अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Bhai Jagtap vs Sambhaji Bhide
Loksabha Election : काँग्रेस कर्नाटकात लोकसभेच्या 'इतक्या' जागा जिंकणार; मुख्यमंत्र्यांनी आकडाच सांगून टाकला

यावेळी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, झाकीर पठाण, अजित पाटील-चिखलीकर आदी उपस्थित होते.

Bhai Jagtap vs Sambhaji Bhide
Bhai Jagtap News : शरद पवारांचं 'ते' वागणं आम्हाला खटकलंच; काँग्रेस आमदाराचा नेमका कोणावर निशाणा?

आमदार जगताप म्हणाले, लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन दीडशे वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या स्वातंत्र्यावर टीका करणारा हा माणूस. याला माथेफिरू हा शब्दही सौम्य झाला आहे. ज्या माणसाला स्वतःचं नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत होवू शकतो? भाजपनंच त्यांना गुरुजी बनवलं आहे. त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, अशीही त्यांनी टीका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()