Vedanta-Foxconn Project : 'महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचं पाप सरकारनं केलं'

वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवलीय.
Congress MLA Satej Patil
Congress MLA Satej Patilesakal
Updated on
Summary

वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवलीय.

कोल्हापूर : पुण्यातील तळेगाव (Talegaon) इथं नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प (Vedanta Group and Foxconn Company Project) गुजरात (Gujarat) राज्यात गेल्यामुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवलीय. गुजरात सरकारनं वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीशी करार केला असून त्याद्वारे गुजरात राज्यात 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.

या गुंतवणुकीद्वारे गुजरात राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्प उभा राहणार असून यातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार (Congress MLA) सतेज पाटील (Satej Patil) यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केलीय. सतेज पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रात होणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीची संयुक्त भागीदारी असलेला 1 लाख 58 हजार कोटींचा देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर उत्पादनाचा प्रकल्प सध्याच्या ईडी सरकारच्या कृपेनं गुजरातला नेण्यात आला आहे.'

'महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण होता'

उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील होतो. वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारी असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण होता. हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये करण्याबाबत जवळपास निश्चित झालं असताना आणि याबाबत सर्व स्तरावर चर्चा झाली असताना अचानक हा प्रकल्प गुजरातला जाणं अत्यंत धक्कादायक असल्याचं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय.

'प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान'

भविष्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी असून महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचं पाप या सरकारनं आज केलंय, अशी घणाघाती टीका सतेज पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.