Ashok Chavan Resigns : आम्ही अजूनही काँग्रेसमध्येच...; चव्हाणांसोबत पक्ष सोडल्याच्या चर्चांवर 'या' आमदारांचं स्पष्टीकरण

Ashok Chavan Resigns from Congress : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Congress mla Vishwajeet Kadam Aslam Shaikh clarify on not leaving Congress with Ashok Chavan Resigns rak94
Congress mla Vishwajeet Kadam Aslam Shaikh clarify on not leaving Congress with Ashok Chavan Resigns rak94
Updated on

Ashok Chavan Resigns from Congress : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यादरम्यान आता चव्हाण हे आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा देखील सुरू आहे. यादरम्यान अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे इतरही काही आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान अशी चर्चा असलेल्यांपैकी विश्वजीत कदम आणि अस्लम शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांंनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नंतर काँग्रेसमधील विश्वजीत कदम, हिरामण खोसकर, सुलभा खोडके, अस्लम शेख, अमीन पटेल यांच्यासह अन्य काही आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र दोन आमदारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले आहे.

मला स्पष्ट करायचे आहे की मी काँग्रेस पक्ष सोडत नाहीये. मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, माझ्या अन्य पक्षात जाण्याबाबत खोट्या बातम्या पसरवण्यापासून दूर राहावे. अनावश्यक गोंधळ निर्माण करणे टाळावे, अशी पोस्ट अस्लम शेख यांनी केली आहे.

Congress mla Vishwajeet Kadam Aslam Shaikh clarify on not leaving Congress with Ashok Chavan Resigns rak94
Devendra Fadanvis on Ashok Chavan: अशोक चव्हाणांसोबत अनेक नेते भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आगे आगे देखो..'

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना कदम म्हणाले की, आज १२ फेब्रुवारी रोजी राज्याचे ज्येष्ठ नेते यांनी आपल्या आमदारकीचा अचानक राजीनामा दिल्याची धक्कादायक बातमी समजली. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला वेदना झाल्या आहेत. मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा दिल्याचा चूकीचा गैरसमज पसरवला जात आहे.

मी आजही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, मतदारसंघातील जनतेला विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेणार नाही असे काँग्रेस आमदार विश्वजीत कदमयांनी स्पष्ट केलं. कोणी कुठलाही गैरसमज पसरवू नये अशी विनंती देखील विश्वजीत कदम यांनी यावेळी केली आहे.

Congress mla Vishwajeet Kadam Aslam Shaikh clarify on not leaving Congress with Ashok Chavan Resigns rak94
Ashok Chavan Resignation : "अचानक असं काय घडलं? मला वाटतं की...", अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर ठाकरे स्पष्टच बोलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.